Sunil Tatkare On Ajit Pawar Death Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: दादांचं पार्थिव समोर असताना काही जणांकडून विलिनीकरणाची चर्चा, तटकरेंचा रोख कुणाकडे

Sunil Tatkare On Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा होत आहेत. सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत मोठं विधान केले आहे. दादांचं पार्थिव समोर असताना काही जणांकडून विलिनीकरणाची चर्चा झाली असल्याचं वक्तव्य त्यांनी केले.

Priya More

Summary:

  • अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या

  • सुनील तटकरे यांनी अंत्यदर्शनाच्या वेळी चर्चा झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली

  • भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेमुळे पक्षात फूट पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले

  • विलिनीकरणाची चर्चा करणे त्या क्षणी दुर्दैवी असल्याचे तटकरे म्हणाले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणातील अनेक समिकरणं बदलली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत देखील चर्चा सुरू आहेत. या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केले आहे. 'दादांचं पार्थिव समोर असताना काही जणांकडून विलीनिकरणाची चर्चा सुरू होती.', असे सुनील तटकरे म्हणाले. साम टीव्हीवरील ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'पुरोगामी महाराष्ट्रात दहावा आणि बारावा हा एक विचार आहेच. कारण तो हिंदू धर्माच्या परंपरेपासून आला आहे. पण अनेक वेळेला तीन दिवसांनंतरही अनेक कुटुंबामध्ये हे विधी संपतात. हे प्रश्न जे आम्हाला विचारत आहेत विलिनीकरणाची चर्चा दादांचा मृतदेह अंत्यदर्शनाला पहिल्या दिवशी ज्यावेळी ठेवले त्या वेळेपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू करण्याची घाई का झाली? तर एक नाही तर सात-आठ नेत्यांनी मुलाखतीचा सपाटाच लावला. दादांची अंतिम इच्छा आहे, या तारखेला त्या तारखेला विलिनीकरण होणार होते. जे विलिनीकरणाची चर्चा करत होते त्यावेळी कुणाच्या तोंडात कधी तरी आले का की आता उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे सुनेत्रा वहिनींनी घ्यावे. का नाही आले त्यांच्या मनात? विलिनीकरणाची चर्चा करत बसले आपण. दादांची अंतिम इच्छा म्हणून बोलत राहिलात.'

सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी वेगळं होण्यामागची कारणं देखील सांगितली. ते म्हणाले की,'दादांची इच्छा २०१४ पासून भाजपसोबत जाण्याची होती. ती त्यांनी अनेक वेळा स्पष्टपणे बोलून देखील दाखवली. त्यांनी २०१९ ला देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेऊन कृतीने देखील दाखवले. २०२३ मध्ये पक्षाचे दोन भाग का झाले कारण आम्ही एनडीएमध्ये गेलो म्हणून झाले. एनडीए म्हणजे कोण भाजप आणि मित्रपक्ष. भाजपसोबत आम्ही गेलो ही भूमिका आवडली नाही त्यामुळे दोन पक्ष झाले. त्यामधून निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, न्यायालयिन प्रक्रिया झाली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ दादांच्या नेतृत्वाखालचा असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. घड्याळ चिन्ह देत सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली.'

सुनील तटकरे यांनी पुढे सांगितले की, 'एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्यावेळी युती किंवा आघाडी निवडणूक पूर्व होत असते. त्यावेळी जागा वाटप होत असताना आमच्या वाट्याला जागा कुठल्या आल्या. मूळ राष्ट्रवादीने २०१९ मध्ये ५६ जागा जिंकल्या होत्या त्या जागा आमच्या वाट्याला आल्या. त्यामुळे स्वाभाविकपणे आमची जी राजकीय लढाई झाली विधानसभेला ती बहुतांश ९० टक्के ठिकाणी तुतारीसोबत झाली. स्वतंत्रपणे लढलो आणि निवडून आलो. आमचा निर्णय आम्ही त्याठिकाणी घेतला. इतरांना जे काही बोलायचे होते मग ते विलिनीकरण असेल किंवा इतर काही टप्पे असतील ते नंतर बोलता आले असते. पण आम्ही काही तरी वेगळे केले त्याला ३ दिवसांनंतर जोडण्याचे प्रयत्न केला गेला हे दुर्दैवी आहे. '

विलिनीकरणाची चर्चा झाली होती का? यावर उत्तर देताना तटकरे यांनी सांगितले की, 'मला माहिती नाही. त्यांनी सांगितले की त्या सगळ्या चर्चांमध्ये दादा होते. दादांना माझ्यावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तर सुनील त्या निर्णयाशी सहमतच राहणार. अनेक वेळेला असे अनेक निर्णय घेताना आम्ही चर्चा देखील करायचो. मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी असतील आपली मतं आम्ही मांडायचे. पण पक्षनेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्ही अंतिम निर्णय मानतच आलो. लोकशाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत होतीच पण नेतृत्वाने घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याचे काम हे आपले कर्तव्यच आहे त्यानुसार पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: दु:खापासून लांब राहण्यासाठी काय केलं पाहिजे? चाणक्यांनी सांगतले सगळ्यात मोठं सत्य

Maharashtra Live News Update: १८ तारखेला रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद, विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशनचा दुसरा अंक

थरारक! तरुण रेल्वे ट्रॅकवर डोके ठेवून झोपला, तितक्यात ट्रेन आली अन्...; CSMT स्टेशनवरील धक्कादायक प्रकार, VIDEO

Rohit Shetty Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; राजस्थान, हरियाणा आणि यूपीमधून सहा आरोपींना अटक

Ajit Pawar Death: दादांच्या निधनाच्या तिसर्‍याच दिवशी सुनेत्रा पवारांनी DCM पदाची शपथ का घेतली? तटकरेंनी सांगितलं पडद्यामागील राजकारण

SCROLL FOR NEXT