खोपोली नगरपरिषदेचा निकाल लागला आणि शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांनी गुलाल उधळला आणि पाच दिवसात त्यांचा कुंकू पुसला. मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी निघृण हत्या झाली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मंगेश हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक होते.
या हत्येच्या प्रकरणात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून सुधाकर घारे हे खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे.सुधाकर परशूराम घारे, भरत भगत, रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण, रविंद्र देवकर यांचा बाऊन्सर आणि इतर 3 आरोपींची नावे आहेत.
नेमके प्रकरण काय?
खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानसी काळोखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर उभ्या होत्या. 21 डिसेंबरला लागलेल्या निकालात उर्मिला देवकर यांचा 700 पेक्षा जास्त मतांनी मोठा पराभव झाला. या पराभवाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून हा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.
सुनील तटकरेंच्या घरात शिजला हत्येचा कट, आमदार थोरवेंचा गंभीर आरोप
शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येचा कट खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी रचण्यात आला असा खळबळजनक आरोप थोरवे यांनी केला आहे. या आरोपामुळे महायुतीमधील दोन मित्रपक्षांमधील वाद निर्माण झाला आहे. लोकशाही पद्धतीने आतापर्यंत सगळ्या निवडणुकांना आपण सामोरे गेलोय. पण सुनील तटकरे रायगडमध्ये सत्तेत आल्यापासून रक्तरंजित राजकारण सुरू झाले. बीडनंतर आता रायगडचे आका सुनील तटकरे आहेत. सुनील तटकरेंच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना मारण्यात येत आहे.
आजही सुधाकर घारे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैठका घेत आहे. सुनील तटकरे सांगता की सुनील घारेचा या प्रकरणात हात नाही असे सांगत आहेत. या प्रकरणाचा त्यांनी तपास केला का? याचा अर्थ हे सगळे पूर्वनियोजित आहे. सुधाकर घारे एफआयआरमधला आरोपी आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवस आधी रवी देवकर सरकारी वकिलांच्या मार्फत सुतारवाडीत गेला होता. त्याठिकाणी सुनील तटकरेंसोबत बसून, चर्चा करून नियोजितपणे मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली असे महेंद्र थोरवे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.