Sugar Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

Sugar Price Hike: सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये साखर महाग होण्याची शक्यता आहे. साखरेचे दर शंभरीपार जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Priya More
  • साखरेचे भाव १०० रुपये किलोच्या पुढे जाणार

  • दिवाळीपूर्वी साखर महागण्याची शक्यता

  • भारतात साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते

  • ऊस लागवड घटल्याचा साखरेच्या दरावर परिणाम

नवरात्री आणि दिवाळीचा सण जवळ येत असताना सर्वासामान्यांची चिंता वाढणार आहे. कारण साखरेचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत फरार महागण्याची शक्यता आहे. ७० टक्के ऊस लागवडीत घट आणि इथेनॉल निर्मिती यामुळे देशात साखर टंचाईची भीती निर्माण झाली आहे. देशाची २७० ते २८५ लाख मेट्रिक टन साखरेची गरज कशी पूर्ण करायची याची साखर उद्योगासमोर मोठी चिंता आहे.

दुष्काळाचा साखर उत्पादनाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ८० टक्के ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यानं आणि अतिवृष्टीमुळे ब्राझीलचं साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. २०२७ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक असलेल्या भारताला टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढच्या वर्षीचा गाळप हंगाम धोक्यात येण्याची देखील शक्यता आहे.

गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि यंदा अल निनोचा संकटामुळे आगामी काळात साखर शंभरी पार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच दुष्काळामुळे ऊस लागवडीत ७० टक्क्यांची घट आणि आहे हा ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यास देशात साखरेची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच साखरेचे दर शंभरीपार जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांचे टेन्शन वाढणार आहे. Sugar

साखर 100 पार का जाऊ शकते?

गेल्या वर्षीपेक्षा ओपनिंग स्टॉक १२ लाख टन कमी झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा १९ लाख टन साखरेचं कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अल निनोमुळे तर उत्तर प्रदेशमध्ये लाल बुरशीमुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. कारखान्यांना मिळणारा सध्याचा साखरेचा दर -४६०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. इथेनॉलकडे ऊस वळवल्यास फटका बसण्याचा अंदाज आहे. अतिवृष्टी आणि इथेनॉलमुळे ब्राझीलच्या साखर उत्पादनात देखील घट होणार आहे. जागतिक बाजारात तुटवडा निर्माण झाल्यास देशापुढे साखरेच्या टंचाईचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT