मैत्री ही माणसाला आयुष्य जगायला शिकवते, असं म्हणतात. मैत्री ही माणसाला फक्त आयुष्य जगायला नाही तर आयुष्यात खूप मोठं व्हायलाही शिकवते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिरुर तालुक्यातील ॲड. शुभम कराळे, ॲड. सागर नळकांडे आणि ॲड. अक्षय ताठे. या तिघांनीही एकत्र वकीलीची परीक्षा दिली आणि ते एकत्र न्यायाधीशही झाले. (Success Story Of Shirur 3 Friends)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची न्यायाधीश पदासाठी घेतलेल्या परीक्षेत या तिघांनीही एकाचवेळी यश मिळवले आहे. या तिघांनी एक नवीन आदर्श तरुणाईसमोर ठेवला आहे. या तिघांना मेहनत, अभ्यास करण्याची जिद्द याचे फळ मिळाले आहे.
एकत्र शिक्षण आणि सोबतच झाले न्यायाधीश
शिरुर तालुक्यातील या तिन्ही मित्रांची कायद्याचे शिक्षण घेतले आहे. अॅड. शुभम कराळे हे शिक्रापूरचे आहेत. अॅड. सागर नळकांडे बुरुंजवाडी तर अॅड. अक्षय ताठे हे कारेगावचे रहिवासी आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर एलएल.एम पदवी प्राप्त केली.
या तिन्ही मित्रांनी एकत्रित तयारी केली. त्यांनी चार वर्षे नियमिक अभ्यास केला. सोशल मीडियापासून त्यांनी स्वतः ला लांब ठेवले. अॅड. शुभम कराळे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायलयात फौजदारी वकीली केली. तर अॅड. सागर नळकांडे आणि अॅड. अक्षय ताठे यांनी दिवाणी न्यायालयात वकिली केली. त्यांनी वेळोवेळी एकमेकांना मार्गदर्शन केले. एकत्र मेहनत घेतली. त्याचे त्यांना फळ मिळाले.
यानंतर त्यांनी २०२३ साली एमपीएससी (MPSC) न्यायाधीश परीक्षेची तयारी केली. त्यांनी अॅड. गणेश शिरसाट यांचे मार्गदर्शन घेतले. १४४ विद्यार्थ्यांपैकी फक्त या तिघांची निवड झाली. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.