Success Story Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: NIT मधून इंजिनियरिंग, नोकरीसोबत UPSC चा अभ्यास; नाशिकचे राजू वाघ झाले सरकारी अधिकारी

UPSC Success Story of Raju Wagh: नाशिकच्या राजू वाघ यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी नोकरी करता करता अभ्यास केला. त्यांच्या या मेहनतीमुळेच त्यांना हे यश मिळालं आहे.

Siddhi Hande

नाशिकच्या राजू वाघ यांचा प्रेरणादायी प्रवास

नोकरीसोबत केली यूपीएससी परीक्षेची तयारी

नोकरी करता करता केला अभ्यास

इच्छा तिथे मार्ग, असं म्हटले जाते. त्यामुळे जर तुमची इच्छाशक्ती असेल तर कोणतेही यश तुम्ही अगदी सहज मिळवू शकतात. असंच काहीसं सीआरपीएफ कमांडंट राजू वाघ यांनी केलं. त्यांनी खूप कष्टाने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी नोकरी करत करत यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

मेहनत, सातत्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी २०२४ च्या यूपीससी परीक्षेत ८७१ रँक प्राप्त केली.

सीआरपीएफ कमांडंट हे मूळच्या महाराष्ट्रातील नाशिकचे रहिवासी. त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी २०१८ मध्ये सुरु केली होती.ते २०१४ ते २०१९ पर्यंत कोल इंडियामध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

नोकरी करता करता अभ्यास

राजू वाघ यांनी नवोदय विद्यालयातून सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी एनआयटी नागपूरमधून इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. याचसोबत त्यांनी नोकरीदेखील केली. रोज सकाळी ते ४ ते ६ वाजेपर्यंत अभ्यास करायचे. दिवसा २ ते ३ अभ्यास करायचे. वीकेंडच्या दिवशी ते दिवसभर अभ्यास करायचे.

कुटुंबाची खंबीर साथ

राजू वाघ यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. अनेकदा त्यांना अपयश आले. परंतु त्यांची पत्नी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्या राजी यांच्या प्रेरणास्त्रोत बनल्या. त्यांनी कुटुंबाच्या साथीने शेवटी २०२४ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांच्या या यशामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan - Ankita Walawalkar : लाडक्या भावाच्या लग्नाला बहीण गैरहजर; अंकिताने सूरजसाठी केली खास पोस्ट, दिला सुखी संसाराचा मंत्र

Pune Municipal Polls: निवडणुकीच्या रणधुमाळीत बिबट्याची धास्ती, निवडणुकांचा प्रचाराला ब्रेक

Maharashtra Live News Update: नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Palak Thalipeeth Recipe: सकाळी नाश्त्याला खुसखुशीत पालकचे थालीपीठ कसं बनवायचे?

Repo Rate: RBI देणार खुशखबर! रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात होण्याची शक्यता, कर्ज स्वस्त होणार

SCROLL FOR NEXT