Success Story Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Success Story of Maval Farmer: मावळच्या उच्चशिक्षित तरुणाने स्वतः चा व्यवसाय सुरु केला आहे. कोंबडी पालनाच्या व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहे.

Siddhi Hande

दिलीप कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्याची इच्छा तर सर्वांचीच असते. चांगल्या पगाराची नोकरी करुन शहरात राहण्याचे स्वप्न असते. परंतु मावळच्या तरुणाने यापेक्षा वेगळा मार्ग निवडला. त्याने दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतः चं काहीतरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. कष्ट करायची ताकद आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने हे पाऊल उचलले आणि त्याला यशदेखील मिळाले.

कष्ट करणाऱ्या प्रत्येकालाच यश मिळते. याचंच उत्तम उदाहरण हा तरुण आहे. मावळच्या ग्रामीण भागातील भोयरे गावामध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने व्यवसाय सुरु केला आहे. त्याने गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय केला आहे. आज तो या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

नितीन कडू असे या तरुणाचे नाव आहे. त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले.मात्र दुसऱ्याची नोकरी किंवा गुलामी करण्यापेक्षा आपणच एखादा व्यवसाय सुरू करावा,असं त्यांनी ठरवलं. नितीनच्या वडिलांनी त्याला एक कल्पना सुचवली की, आपली शेती आहे. आपल्या शेतात जर तू कोंबडी पालनाचा व्यवसाय केला तर नक्की यशस्वी होईल. सर्वप्रथम नितीन ने 100 गावरान कोंबड्या पाळण्यास सुरुवात केली.त्यानंतर आत्ता त्याच्याकडे लहान मोठ्या सहाशे गावरान कोंबड्या आहे. मात्र हा भाग अतिशय ग्रामीण असल्यामुळे कोंबड्या विकायच्या कुठे हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे होता.

वडिलांचा सल्ला घेऊन त्याने एक छोटे हॉटेल काढले. हॉटेल जोरात चालू लागले. सध्या राज्यासह मावळात सुद्धा खवय्यांची कमी नाही. ग्रामीण भाग असला तरीही खवय्ये गावरान कोंबडी वर ताव मारण्यासाठी गर्दी करत आहे.

दरम्यान,कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला मात्र त्याची निगा कशी राखायची खाद्य कशाप्रकारे द्यायचं याची सर्व माहिती कृषी अधिकार्‍याकडून घेतली. योग्य आहार आणि वेळेवर औषध उपचार त्यामुळे कोंबड्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मराठी माणूस काहीच करू शकत नाही असं म्हटलं जाते मात्र नितीन कडू यांनी हे खोटं ठरवून छोटे खाणे हॉटेल चालू करून आपणही काहीतरी वेगळे करू शकतो हे दाखवून दिलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Astro Tips: पैसा हातात राहत नाही? तुमच्या या सवयी ठरतील कारणीभूत

Maharashtra Live News Update: सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT