Degree Admission: बारावीचा निकाल लागला, आता पदवी प्रवेशासाठी धडपड; ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

Degree Admission: बारावीचा निकाल लागल्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यभरातील अनेक महाविद्यालयांनी ऑलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता पदवीसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धडपड सुरू झाली आहे.
Degree Admission: बारावीचा निकाल लागला, आता पदवी प्रवेशासाठी धडपड; ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
Degree AdmissionSaam TV
Published On

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. बारावीचा निकाल लागला आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे लागले आहे.

निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रसिद्ध महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू केल आहे. निकाल लागल्यानंतर लगेचच ऑनलाइन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पदवीसाठी चांगले कॉलेज मिळावे यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धडपड आता सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पदवी प्रवेश प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे शहरातील महाविद्यालयाने पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. बीए, बीकॉम आणि बीएससी या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय आजपासून प्रवेश प्रक्रिया राबविणार आहेत. महाविद्यालयाने निकालानंतर लगेचच आपापल्या वेबसाईटवर प्रवेशांची माहिती प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी वेळापत्रक आणि अर्जाची लिंक ही माहिती महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Degree Admission: बारावीचा निकाल लागला, आता पदवी प्रवेशासाठी धडपड; ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
SSC HSC Fee Hike: बारावीच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय! पुढच्या वर्षापासून परीक्षा शुल्कात मोठी वाढ

यंदा उत्तीर्णचे प्रमाण कमी असल्याने पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याला अडचण येणार नाही. निकालात घट झाल्यामुळे पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. यंदाचा निकाल मागील वर्षाच्या तुलने १६ दिवस लवकर लागल्यामुळे महाविद्यालयांनी प्रवेशासाठी अधिक वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र महाविद्यालयांनी लगेचच प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना लगेचच निर्णय घ्यावा लागणार आहे.

Degree Admission: बारावीचा निकाल लागला, आता पदवी प्रवेशासाठी धडपड; ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
HSC Result 2025: बारावीचा निकाल जाहीर! कोकणने परंपरा राखली तर लातूर तळाशी, जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?

९ विभागीय मंडळाचा निकाल -

पुणे - ९१.३२ टक्के

नागपूर - ९०.५२ टक्के

छत्रपती संभाजीनगर - ९२.२४ टक्के

मुंबई - ९२.९३ टक्के

कोल्हापूर - ९३.६४ टक्के

अमरावती - ९१.४३ टक्के

नाशिक - ९१.३१ टक्के

लातूर - ८९.४६ टक्के

कोकण - ९६.७४ टक्के

Degree Admission: बारावीचा निकाल लागला, आता पदवी प्रवेशासाठी धडपड; ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
12th HSC Result : धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाले, १७ वर्षांच्या मुलीने आयुष्य संपवलं

कोणत्या शाखेतून किती टक्के विद्यार्थी पास?

कोणत्या शाखेची किती टक्केवारी?

विज्ञान- ९७.३५ टक्के

कला- ८०.५२ टक्के

वाणिज्य- ९२.६८ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३ टक्के

आयटीआय- ८२.०३ टक्के

Degree Admission: बारावीचा निकाल लागला, आता पदवी प्रवेशासाठी धडपड; ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
12th HSC Result : अभिनंदन! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com