SSC HSC Fee Hike: बारावीच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय! पुढच्या वर्षापासून परीक्षा शुल्कात मोठी वाढ

SSC HSC Fee Hike From 2025-26: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक निर्णय घेतला आहे. आता दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली जाणार आहे.
SSC HSC Fee Hike
SSC HSC Fee HikeSaam Tv
Published On

काल बारावीचा निकाल लागला. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली जाणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. (SSC HSC Fee Hike)

SSC HSC Fee Hike
HSC New Syllabus: मोठी बातमी! २०२७ -२८ मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार

राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत परीक्षा शुल्क वाढीच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. या चर्चेनंतर आता परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दहावी बारावीच्या बोर्डाची फी वाढणार आहे. ही फक्त परीक्षा फी वाढलेली आहे. इतर शुल्कांमध्ये जसे प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क व प्रमाणपत्र शुल्कात कोणताही बदल केला नाही. यासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क कायम आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर मिळणाऱ्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे लॅमिनेट स्वरूपात दिली जातात. यासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारले जातात. या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु आता विद्यार्थ्यांना दहावी- बारावीच्या परीक्षेसाठी ५२० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षा सुल्कामध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय १७ नंबर फॉर्म भरुन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना १११० रुपये नोंदणी फी भरावी लागणार आहे.

SSC HSC Fee Hike
HSC Result 2025: बारावीचा निकाल जाहीर! कोकणने परंपरा राखली तर लातूर तळाशी, जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?

सलग तिसऱ्या वर्षी परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. शासनाने तीन वर्षात टप्प्याटप्प्याने ३०टक्के परीक्षा शुल्क वाढवले आहे. त्यामुळे आता आगामी शैक्षणिक वर्षातील मुलांना ५२० रुपये परीक्षा फी द्यावी लागणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी ही वाढ झाली आहे.

SSC HSC Fee Hike
12th HSC Result : धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाले, १७ वर्षांच्या मुलीने आयुष्य संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com