Amravati News: विद्यापीठाकडून एकूण 355 महाविद्यालयांना नोटीस; कारण काय? वाचा सविस्तर

Colleges Notified by the University: महाविद्यालयांनीच एक्यूएआर विद्यापीठाकडे पाठविला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आय.क्यू.ए.सी. विभागाने वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची छायांकित प्रत पाठविण्याबाबत महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे.
Amravati News
Amravati NewsSaam TV
Published On

Education News:

अमरावती विद्यापीठ संलग्नित ३५५ महाविद्यालयांना विद्यापीठाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांना दरवर्षी वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल (एक्यूएआर) पाठविणे अनिवार्य आहे. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ४०५ पैकी केवळ ५० महाविद्यालयांनीच एक्यूएआर विद्यापीठाकडे पाठविला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आय.क्यू.ए.सी. विभागाने वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची छायांकित प्रत पाठविण्याबाबत महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे.

Amravati News
Amravati News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३५७ कोटींचा निधी; अमरावती जिल्ह्यात वाढीव निकषाने मिळणार मदत

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५ च्या तरतुदीनुसार सर्व संलग्नित महाविद्यालये, संस्थांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची प्रत विद्यापीठाकडे पाठविणे गरजेचे आहे. तसेच व्यावस्थापन परिषदेच्या प्राप्त निर्देशानुसार महाविद्यालयांनी एक्यूएआर बंगळुरू येथे नॅक कार्यालयाकडे सादर केल्यानंतर तीन महिन्याच्या आत विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे.

परंतु अमरावती विद्यापीठाशी संलग्नित ४०५ महाविद्यालये आहेत. ३८० महाविद्यालये 'नॅक'मध्ये समाविष्ट आहेत. असे असताना आतापर्यंत -केवळ ५० महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे एक्यूएआर सादर केले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात नियमावली, कायद्याची कशी वाट लावली जात आहे हे दिसून येते. मात्र, यूजीसीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात ढकलगाडी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Amravati News
Crime News: संतापजनक! नोकरीचे प्रलोभन दाखवून फॉर्महाऊसवर नेलं; गुंगीचं औषध देत २० महिलांवर सामूहिक अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com