Crime News: संतापजनक! नोकरीचे प्रलोभन दाखवून फॉर्महाऊसवर नेलं; गुंगीचं औषध देत २० महिलांवर सामूहिक अत्याचार

Rajasthan Crime News: अंगणवाडीत नोकरी लावून देण्याचं प्रलोभन दाखवून १५ ते २० विवाहित महिलांवर नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
Rajasthan 20 Womens Rape Crime News
Rajasthan 20 Womens Rape Crime NewsSaam TV
Published On

Rajasthan 20 Womens Rape Crime News

अंगणवाडीत नोकरी लावून देण्याचं प्रलोभन दाखवून १५ ते २० विवाहित महिलांवर नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडित महिलांना फॉर्महाऊसवर बोलावून घेतलं. त्यानंतर जेवणातून गुंगीचे औषध देत त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता संशयितांनी पीडित महिलांचे फोटो तसेच व्हिडीओ देखील काढले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan 20 Womens Rape Crime News
Women Prisoners Pregnant: महिला कैदी तुरुंगातच होतायत गर्भवती; उच्च न्यायालयातील अहवालामुळे खळबळ

तळपायाची आग मस्तकात जाईल, अशी ही संतापजनक घटना राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात घडली. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करून घेण्यास विलंब केला होता. मात्र, महिलांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी आतापर्यंत ८ संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले.

गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींमध्ये नगरपरिषदेचे सभापती आणि माजी आयुक्तांसहित ८ जणांचा समावेश आहे. दुसरीकडे तक्रारदार महिलांनी आपल्यावर खोटे आरोप केल्याचा दावा संशयित आरोपींनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून सध्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. पीडित महिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अंगणवाडीत नोकरीचे प्रलोभन दाखवून आरोपींनी महिलांना विश्वासात घेतलं. एकावेळी एका महिलेला फॉर्महाऊसवर भेटण्यासाठी बोलावून घेतले.

तिथे गेल्यानंतर आरोपींनी महिलेला जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे बदनामीपोटी महिलेने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही.

मात्र, जवळपास १५ ते २० महिलांसोबत असा घृणास्पद प्रकार घडल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. महिलांनी एकमेकांना आधार देत आरोपींविरोधात पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. मात्र, कोर्टाने फटकारल्यानंतर आतापर्यंत ८ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

नोकरी देतो म्हणून महिलांना बोलावून त्यांचे शोषण केले आणि त्यांना धमकावण्यातही आले. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आश्वासन या महिलांना देण्यात आले होते. या घटनेत हायकोर्टने हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापती महेंद्र मेवाडा, आयुक्त महेंद्र चौधरीसहित आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rajasthan 20 Womens Rape Crime News
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; एअरबॅग उघडून फाटल्या, तिघांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com