sambhajinagar students protest at mahavitran office demands to conduct exam  Saam Tv
महाराष्ट्र

इंजिनिअरिंग,पॉलिटेक्निकसह आयटीआयच्या शेकडो विद्यार्थ्यांचा महावितरण कार्यालयापुढे ठिय्या (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

महावितरणने रद्द केलेली भरती विधानसभा निवडणुकीपूर्वी घ्यावी या मागणीसाठी आज (गुरुवार) छत्रपती संभाजीनगर येथे शेकडाे विद्यार्थ्यांनी महावितरण कार्यालयासमाेर आंदाेलन केले. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी क्रांती चौक ते महावितरण कार्यालय असा मोर्चा काढला हाेता.

या आंदाेलन प्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन महावितरण अधिका-यांसह सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आमच्या आई-वडिलांनी केलेला खर्च परत द्या आणि परीक्षा नाही तर नोकरी नाही असा आशय फलकांवर हाेता.

या आंदाेलनात पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा माेठ्या संख्येने सहभाग हाेता. सुमारे एक ते दीड तास विद्यार्थ्यांनी आंदाेलनस्थळी घाेषणाबाजी केली. यावेळी कायदा व सुवव्यस्था अबाधित राहावी यासाठी पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात अभिजीत पाटील यांची बैलगाडा स्पर्धा

VIDEO : तुतारीसाठी अनेक उमेदवार इच्छुक; मोठी अपडेट आली समोर

UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! २ वेळा JEE पास करून IIT सोडलं; UPSC उत्तीर्ण होऊन IAS पदाचा राजीनामा, कोण आहे 'हा' जिगरबाज तरूण?

Chembur Fire News : चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM शिंदेंकडून पाहणी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहिर

Curd Rice Recipe:रोजच्या पोळी भाजीचा कंटाळा आलाय? मग करा झटपट कर्ड राईस

SCROLL FOR NEXT