NEET Exam Scam
NEET Exam Scam Saam tv
महाराष्ट्र

NEET Exam Scam : चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; संभाजीनगरात युवक काँग्रेसचे न्याय दो आंदोलन

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

रामू ढाकणे 

चंद्रपूर/ संभाजीनगर : नीट परीक्षेच्या निकालानंतर परीक्षेत घोटाळा झाल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलन केले. दरम्यान नीटच्या परीक्षेत झालेल्या अनागोंदी विरोधात चंद्रपुरात आज विद्यार्थ्यांनी मोर्चा काढण्यात आला. तर संभाजीनगरमध्ये देखील युवक काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करत न्याय डॉ आंदोलन करण्यात आले.  

पारदर्शी परीक्षा व्हावी 
चंद्रपूर
: नीट परीक्षेत झालेल्या अनागोंदीच्या विरोधात आज चंद्रपुरात (Chandrapur) विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या पुढाकाराने मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर तो धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. देशात नीट परीक्षा घोटाळा गाजत असून पेपर फुटीपासून ग्रेस मार्क देण्यापर्यंत साऱ्याच गोष्टी आता उघड झाल्याने हा घोटाळा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा पारदर्शी परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

संभाजीनगरात युवक काँग्रेसचे न्याय दो आंदोलन

संभाजीनगर : वैद्यकीय पूर्व परीक्षा अर्थात नीटच्या परीक्षेमध्ये उडालेल्या गोंधळानंतर आज छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) क्रांती चौकात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हा युवक काँग्रेसतर्फे न्याय दो हे आंदोलन करण्यात आलं असून नीट परीक्षेमध्ये झालेले विविध प्रकारचे गैरव्यवहार हा विषय विद्यार्थी आणि पालकांच्या जिव्हाळ्याचा असून झालेल्या या गोंधळामुळे विद्यार्थी प्रचंड संतप्त झाले आहेत. दरम्यान या ठिकाणी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले असून वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेत निषेध केला आहे. दरम्यान यावेळी नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जोरदार घोषणाबाजी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : पुरात अडकलेल्या 56 नागरिकांना राजापूर पोलिसांनी वाचवले

Amravati News: संतापजनक! अमरावतीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, ४ आरोपींना अटक

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची दमदार बँटिंग; अनेक ठिकाणी साचले पाणी; पाहा PHOTO

Sambhajinagar News : मोठी बातमी! शिवसेना गटातील आमदाराच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

Latur Accident News: हृदयद्रावक घटना! भरधाव कारने दुचाकीला उडवले, पतीचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT