Sambhajinagar crime
Sambhajinagar crimeSaam tv

Sambhajinagar crime : मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळी पोलिसांच्या ताब्यात; साहित्य जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sambhajinagar News : गेल्या काही दिवसापासून संभाजीनगर शहरांमध्ये चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चेन, मंगळसूत्र तोडून पसार

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीला पुंडलिकनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून सोन्याची पोत तसेच वितळवण्यासाठी लागणारे काही साहित्य देखील पोलिसांनी जप्त करत ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. 

Sambhajinagar crime
Amravati News : ग्रामपंचायतीने केला दारूबंदीचा ठराव; गावात अवैध धंदे फोफावल्याने ग्रामस्थ हैराण

गेल्या काही दिवसापासून संभाजीनगर (Sambhajinagar) शहरांमध्ये चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चेन, मंगळसूत्र तोडून पसार होणाऱ्या चोरांचा मोठा धुमाकूळ सुरू असल्याचं पहायला मिळालं होतं. अशा काही तक्रारी पोलिसात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरु होता. याच दरम्यान पुंडलिकनगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. 

Sambhajinagar crime
Farmer Success Story : काश्मीरच्या सफरचंदाची सातपुड्यात यशस्वी शेती; युट्युबवर बघून आदिवासी शेतकऱ्याने फुलवली बाग

पोलिसांनी सध्या तीन जणांना ताब्यात घेतले असून या टोळीमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे. कशा पद्धतीने ही टोळी सक्रिय झाली. त्याबरोबरच कुठपर्यंत यांचे धागेदोरे आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. तिघांकडून मुद्देमाल वर काही साहित्य जप्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com