

भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल टी-२० वर्ल्डकपचा भाग नाहीये. मात्र सध्या त्याचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये शुभमन गिल ‘मौजा ही मौजा’ या गाण्यावर नाचताना दिसतोय. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी क्रिकेटर अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंगमध्ये शुभमनने डान्स केल्याचं म्हटलंय. मात्र, या दाव्याबाबत आता वेगळीच माहिती समोर आलीये.
सध्या अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. तो सचिन तेंडुलकर मुलगा असल्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बातम्या झपाट्याने व्हायरल होतायत. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की, शुभमन गिलचा डान्स व्हिडीओ हा अर्जुनच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमधील आहे. परंतु उपलब्ध माहितीनुसार हा दाव्यात तथ्य नसल्याचं समोर आलंय.
फॅक्ट चेकनुसार, हा व्हिडीओ अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंगचा नसून शुभमन गिल त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात उपस्थित होता. त्याच कार्यक्रमात त्याने मित्रांसोबत डान्स केला आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र काही वेबसाइट्स आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ अर्जुनच्या लग्नाचा असल्याचं म्हटलंय.
शुभमन गिलचं नाव यापूर्वी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. त्यामुळे या व्हिडीओची अधिकच चर्चा रंगताना दिसली. अनेक युजर्सनी कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्यात. काहींनी हा व्हिडीओ खरा असल्याचं म्हटलंय तर काहींनी तो एआय जनरेटेड असू शकतो असंही मत व्यक्त केलंय.
विशेष म्हणजे या व्हायरल व्हिडीओबाबत शुभमन गिल किंवा अर्जुन तेंडुलकर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.