chain snatching google
महाराष्ट्र

Badlapur Crime: झटपट पैसे कमावण्यासाठी अजब फंडा, YouTube वर पाहून चेन स्नॅचिंग करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

chain snatching: बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन स्नॅचिंगचे सलग 5 गुन्हे घडले होते. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Dhanshri Shintre

बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बदलापूर पूर्व पोलिसांनी एका अट्टल चेन स्नॅचरला अटक केली असून त्याच्याकडून बदलापूरमधील चेन स्नॅचिंगच्या 5 गुन्ह्यांची उकल झाली आहे. हा चोरटा युट्युबवर चेन स्नॅचिंग कशी करावी? याचे व्हिडीओ बघून चेन स्नॅचिंग शिकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन स्नॅचिंगचे सलग 5 गुन्हे घडले होते. त्यामुळे पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अशातच बदलापूर शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपणच चेन स्नॅचिंगचे 5 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली.

या चोरट्याचं नाव प्रवीण प्रभाकर पाटील असं असून तो कर्जत जवळच्या शेलू इथं राहणारा आहे. प्रवीण याच्यावर आधी कर्जत तालुक्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. त्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने युट्युबवर चेन स्नॅचिंग कशी करावी? याचा व्हिडिओ त्याने पाहिला आणि त्यानंतर बदलापूर शहरात एकटाच येऊन तो चेन स्नॅचिंग करू लागला. मात्र अखेर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने प्रवीण पाटील याला बेड्या ठोकत त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल केली.

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे की, पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे, तसेच अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये 300 स्टेडियम उभारायचे आहे - नितीन गडकरी

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

SCROLL FOR NEXT