Maratha Reservation Saam
महाराष्ट्र

OBC Reservation: निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा डाव हाणून पाडायचा, नवनाथ वाघमारेंची जीभ घसरली

Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली. हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील सरकारने काढला. यावरून आता ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

Priya More

Summary -i

  • निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा डाव हाणून पाडायचा, असे विधान नवनाथ वाघमारेंनी केले.

  • मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला.

  • नवनाथ वाघमारे यांनी लोकप्रतिनिधींवर शिवराळ भाषेत टीका केली.

  • त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केले. त्यानंतर त्यांची मागणी सरकारने मान्य करत हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढला. त्यामुळे आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचा ओबीस नेत्यांकडून विरोध केला जात आहे. आंदोलने, उपोषण आणि मोर्चा देखील काढला जात आहे. बीडच्या भोगलवाडीमध्ये ओबीसीचा महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आक्रमक भाषण केले. यावेळी नवनाथ वाघमारे यांची जीभ घसरली. लोकप्रतिनिधींना त्यांनी शिवराळ भाषा केली. 'निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा डाव हाणून पाडायचा', असं वादग्रस्त विधान त्यांनी केले.

नवनाथ वाघमारे यांनी आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर शिवराळ भाषेमध्ये वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, 'या राज्य सरकारने त्या निजामांच्या अवलादीना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आपल्याला आणून पाडायचा आहे. या निजामाच्या औलादीना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही त्यांनी ठरवला आहे तुमचे राजकीय आरक्षण संपवायचे आहे. पण त्या निजामाच्या औलादीना माझे सांगणं आहे की हे होत नसतं या राज्यात ५६ हजार जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राखीव मिळतात आणि ते त्यांच्या पोटात दुखत आहे.'

शरद पवार नावाचा जातीयवादी फुले शाहू आंबेडकरांचा पाईक मानणारा मात्र आज तो जातीजातीचे राजकारण करत आहे. माजलगावच्या डोंगराला पुन्हा आमदार होऊ द्यायचे नाही. गेवराईच्या पापड्याला पुन्हा आमदार होऊ द्यायचे नाही आणि आष्टीच्या जब्या सुरेश धसला दाखवून देऊ आणि खासदार चंदन चोर बजरंग सोनवणेची काय अवकात आहे. बीडचा आमदार संदीप क्षीरसागर काकाचा होऊ शकला नाही.', अशी शिवराळ भाषा करत त्यांनी सर्व नेत्यांवर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बॅनरबाजी केली होती आणि त्यानंतर लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र सरकारने मनोज जरांगेंच्या उपोषणाची दखल घेत त्यांना हैदराबाद गॅजेटचा जीआर काढून त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर पुन्हा आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघामध्ये बॅनरबाजी केली आहे. 'मराठ्यांचा ऐतिहासिक विजय महायुती सरकारचे जाहीर आभार', अशा आशयाचे बॅनर त्यांनी लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

Farm Benefits For Wife : पती-पत्नीच्या नावे शेती असल्यास, आता फक्त पत्नीलाच मिळणार लाभ | VIDEO

Devendra Fadnavis : 'नवीन नागपूर'ला ११००० कोटींचा बूस्टर डोस, एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करार

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Jahnavi Killekar: बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...

SCROLL FOR NEXT