
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल.
तक्रार मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाकडून दाखल झाली.
मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून संघर्ष.
संजय जाधव, साम प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानं राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झालेत. ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी ओबीसी नेते मोट बांधत आहेत, जागोजागी आंदोलन करत आहेत. आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी सराकरच्या विरोधात रणशिंग फुकले आहे. दरम्यान ओबीसीसाठी लढा देणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आलीय. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाने ही तक्रार दाखल केली आहे.
मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या हाती आरक्षणाबाबतचा शासन निर्णय सोपविल्यावर राज्यात ओबीसी मराठा वाद सुरू झालाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणविषयक शासन निर्णयाची प्रत फाडल्यावर वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणविषयक शासन निर्णयाची (अध्यादेशाची) प्रत फाडल्यावर वातावरण चांगलेच तंग झाले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे. दूरवरचा बुलढाणा जिल्हादेखील याला अपवाद ठरला नाहीये. लक्ष्मण हाके यांच्यावर याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार करण्यात आलीय.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसात ही तक्रार करण्यात आलीय. हाकेंविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रारकर्त्याची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे दोन समाजात तेढ निर्माण होईल. राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सोबतच शासनाने काढलला अध्यादेश त्यांनी फाडला. त्यांनी संविधानाचाही अवमान केला आहे.. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मराठा आंदोलकाने केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.