Kolhapur News  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरात राडा; भर रस्त्यात दोन गटात तुफान हाणामारी अन् दगडफेक, व्हिडिओ व्हायरल

Kolhapur Latest News : कोल्हापुरात भर रस्त्यात राडा झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूरच्या पन्हाळा मार्गावरील वाघबीळ येथे काही तरुणांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. तरुणांच्या जमावाकडून काहींवर दगडफेक करण्यात आली. तर काहींना मारहाण करण्यात आली. काही तरुण दुकानांसमोर लावलेल्या गाड्या फोडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हाणामारीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

कोल्हापुरातील पन्हाळा - रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटात तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. कोल्हापूर आणि जाफळे गावातील तरुणांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पन्हाळ्यातील एका खासगी महाविद्यालयातील तरुणांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. काठी आणि दगडफेक करत फ्रीस्टाईल हाणामारी झाली. तरुणांनी वाहनांवर हल्ला करत वाहनांचे नुकसान केले. कारण अद्याप अस्पष्ट आहे. पन्हाळा आणि कोडोली पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

नेमकं काय घडलं?

वाघबीळ परिसरात एक महाविद्यालय आहे. या परिसरात कॉलेजच्या दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. वाघबीळ हा पन्हाळ्याला लागून असलेला घाट आहे. वाघबीळमध्ये काही पान टपऱ्या आणि चहाच्या गाड्या आहेत. दोन्ही गट चहाच्या गाड्यावर उभे असताना वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एका जमावाने त्यांनी आणलेल्या गाड्या देखील फोडल्या.

सर्व तरुण रस्त्यावर हाणामारी करू लागले. मात्र, या हुल्लबाज तरुणांनी दगडफेक केली. हाणामारी केल्यानंतर दोन्ही गट परिसरातून पसार झाले. आता या घटनेनंतर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल. दोन्ही गटाच्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गटाच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT