LPG Price Hike : पेट्रोलनंतर गॅसचा भडका; घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागला

LPG Price Hike News : पेट्रोलनंतर गॅसचा भडका उडालाय. घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांना दणका बसला आहे.
LPG Price
LPG Price HikeSaam tv
Published On

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता गॅस सिलिंडरही ५० रुपयांनी महागला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना दुहेरी झटका बसला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

उज्ज्वला गॅस सिलिंडर आधी ५०३ रुपयांना मिळत होता. आता तोच सिलिंडर ५५३ रुपयांना मिळणार आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरचे दर ८०३ रुपयांऐवजी ८५३ रुपयांना मिळणार आहे. १४ किलोंचा घरगुती गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी महागला आहे. दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडर ८५३ रुपयांना मिळणार आहे.

LPG Price
Bitcoin fall : टॅरिफ बॉम्बमुळे जगात हाहाकार, शेअर बाजारच नाही Bitcoin ही पडले, आता किती झाली किंमत?

लखनौत गॅस सिलिंडर ८९०.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये गॅस सिलिंडर ८७९ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत ८५२.५० रुपये आणि चेन्नईत ८६८.५० रुपयांना मिळणार आहे. सबसिडी आणि सामान्य श्रेणीतील गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होणार आहे. गॅस सिलिंडरचे नवे दर ८ एप्रिलपासून लागू होणार आहेत. सरकारने पेट्रोल-डिझेलवर २-२ रुपयांनी एक्साइज ड्युटी वाढवल्यानंतर गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.

LPG Price
Nashik Shocking : महाराष्ट्र हादरला! बायको माहेरी गेल्याने सटकली; नवऱ्याने पत्नी आणि सासूला जिवंत पेटवलं

उज्ज्वला गॅस सिलिंडर आधी ५०३ रुपयांना मिळत होता. आता तोच सिलिंडर ५५३ रुपयांना मिळणार आहे. दिल्लीतील एलपीजी सिलिंडरचे दर ८०३ रुपयांऐवजी ८५३ रुपयांना मिळणार आहे. १४ किलोंचा घरगुती गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी महागला आहे. दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडर ८५३ रुपयांना मिळणार आहे. लखनौत गॅस सिलिंडर ८९०.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये गॅस सिलिंडर ८७९ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत ८५२.५० रुपये तर चेन्नईत ८६८.५० रुपयांना मिळणार आहे.

LPG Price
Shah Rukh Khan : ५ सिनेमा, ३४०० कोटी रुपयांची कमाई; शाहरुख खानला कोणत्या सिनेमाने केले मालामाल? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com