गणेशोत्सवासाठी बिनधास्त करा बसने प्रवास; प्रशासनाने घेतली विशेष काळजी Saam Tv
महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी बिनधास्त करा बसने प्रवास; प्रशासनाने घेतली विशेष काळजी

रायगडच्या राज्य परिवहन विभागाने खबरदारीची पावले उचलली आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रायगड: गणेशोत्सव सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्याच्या सुरक्षेसाठी रायगडच्या राज्य परिवहन (state transport department) विभागाने खबरदारीची पावले उचलली आहेत. एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या दृष्टीने सर्व बसेस निर्जंतुकीकरण केल्या जात आहेत. यात महत्वाचे म्हणजे नव्या पद्धतीचा अवलंब करून सर्व बसेस अँटी मायक्रोवेअर कोटीन बॅक्टेरियल स्प्रेने निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बॅक्टेरियल स्प्रेमुळे सहा महिने याचा प्रभाव टिकून राहणार असल्याने प्रवाशांचा प्रवास हा आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित होणार आहे. गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने कोकणात जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 1300 बसेसची बुकिंग झाली आहे. गणेशभक्तांना प्रवासात कोणतीही अडचण होऊ नये यासाठी महामार्गावर ब्रेक डाऊन बस आणि दुरुस्ती पथक नेमण्यात आले आहेत. अशी माहिती रायगड विभागाच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

गणेशोत्सव सणावर यावर्षीही कोरोनाची टांगती तलवार असली तरी गणेशभक्त हे आपल्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात दाखल होणार आहेत. कोकणात जाणाऱ्या जिल्ह्यातील चाकरमानी गणेशभक्तांसाठी राज्य परिवहन विभाग रायगड हा सज्ज झाला आहे. राज्य परिवहन रायगड विभागाने प्रवाशाच्या आरोग्याची काळजी घेतली असून सर्व बसेस ह्या अँटी मायक्रोवेअर कोटीन बॅक्टेरियल स्प्रेने निर्जंतुक केल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास हा सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. अलिबाग, पेण आगारातील सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण पूर्ण झाले असून महाड आणि इतर आगारातील बसेसही लवकरच निर्जंतुक केल्या जाणार आहेत.

गणेशोत्सवसाठी 1300 बसेसची बुकिंग हाऊसफुल

कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवसाठी चाकरमानी हा आवर्जून आपल्या गावी जात असतो. रायगड जिल्ह्यातूनही रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या चाकरमानी याची संख्या मोठी आहे. रायगड जिल्ह्यातून एसटी बसने जाणाऱ्या गणेशभक्तांनी आगामी बुकिंग केली आहे. जिल्ह्यातून 1300 बसेसची बुकिंग झाली असून अजून दीडशे ते दोनशे एसटी बसेसची बुकिंग होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रायगडातून कोकणात गणेशोत्सवसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यावर्षी राज्य परिवहन विभागाला बुकिंग मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे.

महामार्गावर ब्रेक डाऊन बस आणि दुरुस्ती पथक तैनात

राज्य परिवहन रायगड विभाग हा गणेशोत्सव निमित्त सज्ज झाला आहे. चाकरमानी गणेशभक्ताचा प्रवास हा सुरक्षित आणि विना अडचणींचा व्हावा यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे. एसटी बस ही महामार्गावर काही कारणास्तव बंद पडल्यास त्या त्वरित दुरुस्त व्हाव्यात यासाठी ठिकठिकाणी दुरुस्ती पथके तैनात केली आहेत. रामवाडी, वाकण फाटा, सुखेळी खिंड, लोणारे फाटा, कशेडी घाट याठिकाणी ब्रेक डाऊन बस आणि पथक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच रोहा, माणगाव, पेण, महाड येथेही दुरुस्ती पथक तयार ठेवण्यात आली आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

SCROLL FOR NEXT