मुंबईतुन तडीपार अन् 16 गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा गजाआड

डोंबीवली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. CCTV च्या आधारे त्याला अटक झाली आहे.
मुंबईतुन तडीपार अन् 16 गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा गजाआड
मुंबईतुन तडीपार अन् 16 गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा गजाआडप्रदिप भणगे
Published On

प्रदिप भणगे

डोंबिवली: मुंबईतुन तडीपार आणि 16 गुन्हे असलेल्या सराईत चोरट्याला डोंबिवली मधील रामनगरच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि त्याच्याकडून 1,07,269 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डोंबिवली मधील महावीर नॉव्हेल्टी या मोबाईलच्या दुकानातून पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्याने शॉपचे टाळे तोडुन आणि शटर उघडुन शॉपमध्ये प्रवेश करून शॉपमधील रॅकवर विक्रीकरिता ठेवलेले सॅमसंग कंपनीचे ९२,५६९ रू, किंमतीचे ७ मोबाईल व गल्ल्यातील ५०००/- रू.रोख रक्कम चोरून गेल्याची घटना घडली होती.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याबाबत फिर्यादी धवल संगोई यांनी रामनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सीसीटीव्हीच्या आधारे आणि सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक दाभाडे आणि टीमने सदर चोरट्याचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदार मार्फत माहिती घेऊन दिनांक ३१/०८/२०२१ रोजी ९० फिट रोड, डोंबिवली पुर्व येथे एक इसम संशयास्पदरीत्या उभा असलेला पोलिसांना दिसला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने नाव सुरज रामदास चव्हाण (वय 30) संजय पाटोळे चाळ, खडवली गाव,जि.ठाणे असे असल्याचे सांगितले.

मुंबईतुन तडीपार अन् 16 गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा गजाआड
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत; तरुणीला मागितली तीन लाखांची खंडणी

यावेळी त्याच्या पॅन्टचे उजव्या खिशात सॅमसंग कंपनीचे २ मोबाईल मिळून आले. सदर मोबाईलबाबत पडताळणी केली असता, सदरचे मोबाईल फोन हे डोंबिवली पोलीस ठाणे भा.द.वि.क.४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हयातील असल्याची खात्री पोलिसांना झाली आणि ताब्यात घेवुन अटक केली आली. सदर चोरट्याकडून अधिक माहिती घेतली असता सॅमसंग गॅलेक्सी कंपनिचे ५ मोबाईल फोन, तसेच इतर गुन्हयातील एल.ए.डी.टी.व्ही., चांदीचे भांडे, व इतर ६,७००/- रोख रक्कम, असे हस्तगत करण्यात आले.

एकुण १,०७,२६९/- किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदर आरोपीत याचा पुर्व गुन्हेगारी रेकॉड असून महात्मा फुले पोलीस ठाणे-०३ गुन्हे, पायधुनि पोलीस ठाणे, मुंबई -०२ गुन्हे, एल.टी.मार्ग पोलीस ठाणे मुंबई-०४ गुन्हे, माता रमाबाई पोलीस ठाणे, मुंबई-०५ गुन्हे असे विविध पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि बहुतेक गुन्हयामध्ये त्याने शिक्षा भोगलेली आहे.सदरचा आरोपीत हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com