Kolhapur Sangli highway Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News: श्रावणात देवदर्शनासाठी निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; दोन सख्ख्या जावांसह चिमुकल्याचा अपघाती मृत्यू

Kolhapur Sangli highway Accident News: कोल्हापूर-सांगली महामार्गावर रामलिंग फाट्यावर प्रवासी रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या घटनेत रिक्षामधून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur Accident News: कोल्हापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावर रामलिंग फाट्यावर सोमवारी (२१ ऑगस्ट) सायंकाळी प्रवासी रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या घटनेत रिक्षामधून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या जावांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. (Latest Marathi News)

याशिवाय अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. शिवानी घेवरचंद खत्री (वय ३२), ललिता अंतराज खत्री (४०) आणि श्रीतेज विलास जंगम (९, सर्व रा. इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. तर रिक्षाचालक प्रशांत पेटकर व कियान घेवरचंद खत्री गंभीर जखमी आहेत.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील रिक्षाचालक प्रशांत पेटकर रिक्षामधून दोन महिला आणि दोन लहान मुलांना घेऊन श्रावण सोमवार निमित्त रामलिंग धुळोबा डोंगरातील मंदिराकडे निघाले होते.

दरम्यान, हातकणंगलेहून महामार्गावरून रामलिंग फाट्याकडे वळण घेत असताना, कोल्हापूरहून आलेल्या कुडाळ-पंढरपूर एसटी बसने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की शिवानी आणि श्रीतेज दोघे जागीच ठार झाले.

गंभीर जखमी ललिता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावरच अपघात झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरून रामलिंग तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे.

मात्र दोन्ही बाजूंनी भरधाव वाहने आणि रामलिंगकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांमुळेचे नेहमीच अपघात होतात. त्यामुळे रामलिंग फाटा येथील वळण धोकादायक ठरले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT