Buldhana Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana ST Bus Accident: राजुर घाटात एसटी आणि लक्झरी बसचा अपघात, 6 प्रवासी गंभीर जखमी

Latest News: एसटी बसला राजूर घाटातील हनुमान मंदिराजवळील वळणावर लक्झरी बसने जोरदार धडक दिली.

Priya More

Buldhana News: बुलडाण्यात (Buldhana) एसटी बस (ST Bus) आणि लक्झरी बसला (luxury bus) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बुलडाण्याच्या राजुर घाटात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एसटी बसमधील 6 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा शहर पोलिसांकडून (Buldhana City Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याजवळच्या राजुर घाटामध्ये एका लक्झरी बसने एसटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. पुण्यावरुन मलकापूरला ही एसटी बस जात होती. या एसटी बसला राजूर घाटातील हनुमान मंदिराजवळील वळणावर लक्झरी बसने जोरदार धडक दिली. घाटातील वळणावर एसटी बसने वेग कमी केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने एसटीला धडक दिली. या अपघातामध्ये एसटीमधील सहा प्रवासी जखमी झाले.

एसटी चालकाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत बसमधील जखमी प्रवाशांना इतर वाहनातून बुलडाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या सर्व जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर लक्झरी चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. या अपघातामध्ये एसटी बसच्या मागील बाजूचे तर लक्झरी बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे राजुर घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT