Pune News: कारचा दरवाजा बंद करायला सांगितल्याने आला राग, पाठलाग करत दुचाकीस्वारासोबत केलं धक्कादायक कृत्य...

Latest News : येरवड्यातील एअरपोर्ट रस्त्यावर ही घटना घडली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv

Pune Police: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शुल्लक कारणावरुन एका कारचालकाने दुचाकीस्वाराला धडक देत त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. येरवड्यातील एअरपोर्ट रस्त्यावर ही घटना घडली आहे. याप्रकरणी कारचालकाविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
Pune Crime News : जेवणाचा डबा न दिल्यानं पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथे राहणारा शुभम शरद बहिरट (26 वर्षे) आणि त्याचे तीन मित्र 11 मे रोजी येरवड्यातील एअरपोर्ट परिसरातून दुचाकीवर निघाले होते. त्याचवेळी या परिसरात थांबलेल्या एका आलिशान कारचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शुभमने कारचालक सचिन ओमप्रकाश शर्माला कारचा दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्यामुळे कारचालकाला शुभमचा खूपच राग आला.

Pune Crime News
Pune Sanjay Matale News: देवदुतासारखे धावले, शेतकऱ्याच्या धाडसाने ५ जणींचे प्राण वाचले; संजय माताळेंचं सर्वच स्तरातून होतंय कौतुक

संतप्त झालेल्या कारचालकाने शुभमच्या दुचाकीच्या पाठलाग करत धडक दिली. त्यानंतर त्याने शुभमला रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शुभमने दिलेल्या फिर्यादीवरुन येरवडा पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी सचिन ओमप्रकाश शर्मा आणि दोन तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सचिनसोबत असलेल्या एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन जखमी शुभम आणि त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com