SSC- HSC Result 2025 Saam Tv
महाराष्ट्र

SSC- HSC Result 2025: १०-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला लागू शकतो निकाल; कुठे अन् कसा पाहाल? वाचा

SSC-HSC Result 2025 Date: दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख आता समोर आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२वीचा निकाल लागू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे आता निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. मे महिना सुरु व्हायला अवघे १५ दिवस उरले आहेत. मे महिन्यात कदाचित १२वीचा निकाल लागू शकतो, असं सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत बोर्डाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारखेबाबत अपडेट आले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, २०२४-२५ वर्षातील दहावी-बारावीचा निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा निकाल जून महिन्यात लागतो. परंतु यावर्षी मे महिन्यात हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२वीचा निकाल तर त्यानंतर १० दिवसांत दहावीचा रिझल्ट लागू शकतो.

निकाल कुठे अन् कसा पहावा? (How to Check HSC Result)

दहावी- बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहे. यासाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा हॉल तिकिट नंबर आवश्यक आहे. हा नंबर असेल तरच तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे तुमचे हॉल तिकीट शोधून ठेवा.

  • सर्वप्रथम तुम्हाला mahresult.nic.in या वेबसाइटवर जायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला तिथे HSC Result 2025 हा ऑप्शन दिसेल.

  • यानंतर तुमचा सीट नंबर टाका. नंतर आईचे अचूक नाव टाका.

  • यानंतर तुम्हाला वेबसाइटवर तुमची मार्कशीट दिसेल. ही मार्कशीट तुम्ही डाउनलोड करु शकतात.

फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. १५ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांना आता निकालाचं टेन्शन आलं आहे. निकाल कधी लागणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. तर हा निकाल मे मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT