SSC Exam : भंडाऱ्यात दहावीचा पेपर व्हाट्सअपवर केला व्हायरल; सहाय्यक शिक्षकासह मुख्याध्यापकाला अटक

Bhandara News : शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यंदा कॉपिमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे कॉपी सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे
SSC Exam
SSC ExamSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान भंडाऱ्याच्या चिचाळ या परीक्षा केंद्रावरुन दहावीचा पेपर व्हाट्सअपवर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता. हा पेपर व्हायरल केल्यावरून शाळेतील सहायक शिक्षकासह मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. 

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. शिक्षण मंडळाच्यावतीने यंदा कॉपिमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे कॉपी सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच तर राज्यात पेपर फुटल्याचा प्रकार देखील घडला आहे. यात दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील चिचाळ या परीक्षा केंद्रावर घडला आहे. याची चौकशी सुरु होती. 

SSC Exam
Raksha Khadse: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड, जळगाव हादरले

दरम्यान या प्रकरणी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. बारव्हा येथील महात्मा गांधी विद्यालयांचे मुख्याध्यापक विशाल फुले (वय ४१) आणि सहायक शिक्षक दीपक मेश्राम (वय ३५) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, मयूर टेंभरे हा अद्याप फरार आहे. 

SSC Exam
Nanded : माता नव्हे वैरीण! एक दिवसाच्या अर्भकाला टाकून आई फरार, शेतकऱ्याला रडण्याचा आवाज आला अन्...

पोलीस पथक गोंदियाकडे रवाना  

दरम्यान फरार मयूर हा गोंदियाचा असल्याने भंडाऱ्याचे पोलीस पथक त्याला अटक करण्याकरिता गोंदियाकडे रवाना करण्यात आले आहे. महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या इतर निविर्दीष्ट परीक्षात होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९८२ सह कलम ३(५) भान्यास २०२३, सह कलम ७२ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com