संजय सूर्यवंशी
नांदेड : मुलीचा जन्म होण्याअगोदरच गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात असतो. तर बऱ्याचदा मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला टाकून आई- वडील फरार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना नांदेडमध्ये समोर आली असून एक दिवसाच्या नवजात बालिकेला शेतशिवारात टाकून माता फरार झाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांकडून सदर मातेचा शोध घेतला जात आहे.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील माळझरा शिवारात ही घटना समोर आली आहे. एक दिवसाची बालिका आढळून आली आहे. या परिसरातील शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी. मजुरांना लहान लेकराचा रडण्याचा आवाज काही जणांना आला. यानंतर आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता एक दिवसाची नवजात बालिका आढळून आली. नागरिकांनी या नवजात बालिकेला उचलून रुग्णालयात नेले.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल
दरम्यान सदर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल होत नवजात बलिकेची तपासणी करून तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या बालिकेवर उपचार सुरु असून प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जात आहे.
त्या मातेचा शोध सुरु
एक दिवसापूर्वी जन्मलेली नवजात बालिका शेतशिवारात सोडून मातेने पलायन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुलीला जन्म देऊन शेतशिवारात सोडून दिलेल्या नवजात बलिकेच्या मातेचा शोध पोलीस घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.