kalicharan maharaj Saam tv
महाराष्ट्र

Kalicharan Maharaj : संविधानाचे शुद्धीकरण करून...; कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले?

Kalicharan Maharaj News : कालीचरण महाराज यांनी भारतीय संविधानावर मोठं भाष्य केलंय.सोलापुरातील दौऱ्यात कालीचरण महाराज यांनी भाष्य केलं.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : 'सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रहितासाठी आणि हिंदूहितासाठी आवश्यक बदल करून कायदे केले पाहिजेत. त्यासाठी संविधानाचे शुद्धीकरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारं संविधान पुनर्निर्मित केलं पाहिजेल, असं वक्तव्य अध्यात्मिक गुरु कालीचरण महाराज यांनी केलं. ते सोलापुरात बोलत होते.

अध्यात्मक गुरु कालीचरण महाराज यांनी भारतीय संविधानावर सोलापुरात भाष्य केलंय. कालीचरण महाराज म्हणाले, 'संविधान हे बहुमताचं पुस्तक आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात १४० संशोधन संविधानात केले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ संविधान राहीलं नाही. काँग्रेसवाल्यांनी इतक्या प्रकारची संविधानाला ठिगळ लावली आहेत. सगळे राजा लोक बहुमताचे पुस्तक बनवतात आणि त्याला संविधान म्हणतात'.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना कालीचरण महाराज म्हणाले, 'ज्यांना सौभाग्य प्राप्त करून घ्यायचं असतं, ते पवित्र नदीत स्नान करतात. एकनाथ शिंदे हे जर पाप धुण्यासाठी जात असतील, तर त्यांनीही गेलं पाहिजे. भूलोकावर बिना पापाचा जन्माला येत नाही. पाप भोगण्यासाठी भूलोकात जन्माला येतात. एकनाथ शिंदे यांना जे टोमणे मारत आहेत, त्यांना हे धर्म सिद्धांत मान्य आहे. टोमणे मारणाऱ्यांनी कुंभमेळाला गेलं पाहिजे, त्यांचाही जन्म भूलोकात झाला आहे'.

स्वारगेटमधील घटनेवर बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, 'अपराध सिद्ध झाला तर भर चौकात अत्याचार करणाऱ्यांची मुंडकं छाटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजानी त्यांच्या काळात अत्याचार करणाऱ्याला भर चौकात चौरंगाची शिक्षा देत होते. हाच कायदा आता लागू झाला पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT