Speeding Scooter Rider Booked In Chhatrapati Sambhajinagar saam tv
महाराष्ट्र

एकाच स्कुटीवर 5 जण, पोलिसांची नजर पडली! हुल्लडबाज चालक थेट पोलिसांच्या जाळ्यात

Paan Chakki To Aurangpura Dangerous Scooter Riding: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणचक्की ते औरंगपुरा मार्गावर भरधाव आणि धोकादायकरित्या स्कुटी चालवणाऱ्या अदनान पठाणविरोधात छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Omkar Sonawane

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर मधील रस्त्यावर भरधाव वेगाने अन् धोकादायकरित्या स्कुटी चालवून स्वतःसह इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या एका बेपरवा चालकाविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी दुपारी घडलेल्या या प्रकाराप्रकरणी पोलिसांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

अदनान पठाण (रा. पाणचक्की, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आरोपी अदनान याने त्याच्या ताब्यातील स्कुटी सार्वजनिक रस्त्यावर अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे पळवली. पाणचक्की ते औरंगपुरा या गजबजलेल्या मार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करत त्याने धोकादायकरित्या वाहन चालवले. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या या बेजबाबदार चालकाविरोधात छावणी पोलीस ठाण्याचे अंमलदार महाशंख नामदेवराव दांडगे यांनी फिर्याद दिली.

त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अदनान पठाणविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १२५ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १९४, १२८, १८४ आणि १७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शेख करत आहेत. सार्वजनिक रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन करून हुल्लडबाजी करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Kidneys : किडनी निरोगी ठेवायची असेल तर रोज खा हे 7 पदार्थ

Vidyanand Bapat: DJनंतर आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांकडे मोर्चा; विद्यानंद बापटांचा मोठा इशारा

शेअर मार्केटच्या नुकसानीने डोकं फिरलं; चोरीसाठी घरात घुसला अन् 61 वर्षीय वृद्धासोबत भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: येवला व नांदगावमधील मराठा समाज बांधवांचा ताफा अंतरवाली सराटीकडे रवाना

केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; तरुण थेट लोखंडी पाइप घेऊन घुसला अन्...

SCROLL FOR NEXT