Amit Shah-Sunil Tatkare Saam tv
महाराष्ट्र

Amit Shah-Sunil Tatkare : अमित शहा आणि सुनील तटकरे लंच डिप्लोमसी; रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? वाचा

Amit Shah-Sunil Tatkare lunch : रायगडमध्ये अमित शहा आणि सुनील तटकरे लंच डिप्लोमसी पाहायला मिळाली. रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली, यावर तटकरे यांनी भाष्य केलं.

Vishal Gangurde

महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून मिठाचा खडा पडला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा रखडला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर अजित पवार गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचा दावा आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. अशातच खासदार सुनील तटकरे यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लंच केलं. दोघांच्या भेटीत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का, यावर खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी दुपारचं जेवण केलं. या जेवणानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं. पालकमंत्रिपदावर भाष्य करताना सुनील तटकरे म्हणाले, ' पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा नाही. देशाचे गृहमंत्री आपल्याकडे येतात, त्याचे स्वागत करणे अन्य नेत्याचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांचा स्वाध्याय परिवार गुजरातमध्ये मोठा आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असतो हेच अमितभाईंच्या भेटीमुळे दिसून येतो'.

केंद्रीय मंत्रिपदावर भाष्य करताना सुनील तटकरे म्हणाले, 'राज्यामध्ये पक्षाचे संघटन मजबूत करायचे आहे. आगामी येणाऱ्या कालावधी एवढ चांगलं यश जनतेने अधिकृत घड्याळयाच्या चिन्हवर दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या बळावर हे यश घेऊ शकलो. त्यांच्या अस्मितेची निवडणूक त्याचे संघटन या साऱ्यावर अधिक लक्ष केंद्रीत करतोय. केंद्रीय मंत्रिपद आज डोक्यात असण्याचे कारण नाही, या पूर्वीही नव्हता. कडक सुरक्षा यंत्रणाचा त्रास झाल्यानंतरही सहकार्य केल्यामुळे नागरिकांचे आभार. सुतारवाडी सारख्या छोट्याश्या गावात देशाचे गृहमंत्री आम्हा सर्वांसोबत एक तास संवाद साधतात, याचा अभिमान वाटतो'.

'सरक्षा यंत्रणा, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, सार्व. बांधकाम विभागाचे अधिकारी आणि सर्वांनी गेले तीन दिवस मेहनत घेतली. सुरक्षा विभागाचे नियमानुसार नागरिकांना अडचणीना सामोरे जावे लागले नागरिकांनीही सहकार्य केले, असं म्हणत तटकरे यांनी आभार व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT