Special Report  Saam Dgital
महाराष्ट्र

Special Report : लॉजमध्ये लपलेल्या पूजा खेडकरच्या आईला पोलीस कोठडी, वडील दिलीप खेडकर एसीबीच्या जाळ्यात

IAS Pooja Khedkar : आपल्या कारनाम्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरला महाडमधील लॉजमधून अटक केलीय. तर पूजा खेडकरच्या वडिलंही ACB च्या जाळ्यात अडकलेत.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

आपल्या कारनाम्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरला महाडमधील लॉजमधून अटक केलीय. तर पूजा खेडकरच्या वडिलंही ACB च्या जाळ्यात अडकलेत. त्यामुळे अख्खं खेडकर कुटुंब गोत्यात आलंय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

पूजा खेडकरांच्या कारनाम्यानंतर वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकरांचे प्रतापही समोर आले. जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन धमकावणा-या मनोरमा खेडकरला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या सात दिवसांपासून मनोरमा फरार होती.

पोलिसांच्या तपास पथक अखेर मनोरमाचा माग काढत रायगडच्या महाडमध्ये धडकलं. पोलिसांना मनोरमा पार्वती लॉजमध्ये असल्याचा सुगावा लागला. मात्र पोलीस तिथे गेल्यानंतर मनोरमाच्या कारनाम्याचा त्यांनाही धक्का बसला. कारण मनोरमा नाव बदलून या लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून दडून बसली होती. अखेर पोलिसांनी सापळा रचून मुजोर मनोरमाला बेड्या ठोकल्या.. मनोरमानं पोलिसांपासून वाचण्यासाठी काय कारनामे केले पाहूयात...

मनोरमा खेडकरांचे प्रताप

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला पिस्तूलनं धाक

व्हायरल व्हिडिओनंतर मनोरमावर गुन्हा

7 दिवसांपासून मनोरमाचा पोलिसांना गुंगारा

मनोरमाच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं

पुणे, मुंबई आणि अहमदनगरच्या पाथर्डीत छापेमारी

महाडच्या पार्वती लॉजमध्ये मनोरमाचं सहकाऱ्यासोबत नाव बदलून वास्तव्य

इंदूताई ढाकणे आणि दादासाहेब ढाकणे नावाने मनोरमाचं वास्तव्य

मनोरमा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर तिचे पती आणि पूजाचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकरांना एसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. दिलीप खेडकरांनी काय काय प्रताप केले आहेत ते पाहूयात...

2015 मध्ये दिलीप खेडकरांविरोधात खंडणीची तक्रार

2018 मध्ये 25 ते 50 हजारांची लाच मागितल्याची तक्रार

2019 मध्ये खेडकरांनी 20 लाखांची लाच मागितल्याची तक्रार

दिलीप खेडकरांची मालमत्ता उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने ACB कडून चौकशी

गैरवर्तुवणुकीचे आरोप आणि अनेक कागदपत्र संशयाच्या भोव-यात सापडल्यामुळे पूजा खेडकरचं प्रशिक्षण थांबवण्यात आलंय. त्यामुळे तिला मसुरीला हजर राहावं लागणार आहे. तिची आई मनोरमाची धमकावल्याप्रकरणी तुरूंगात रवानगी करण्यात आलीय. तर वडील बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. चांगलंच करामती असल्यामुळे पूजा खेडकरच अख्खं कुटुंबच गोत्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT