NEET Exam Paper Leak Case : NEET परीक्षेसंदर्भात मोठी बातमी! विद्यार्थ्यांचे गुण वेबसाईटवर प्रसिद्ध होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Supreme Court NEET Hearing : NEET पेपर लीकप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने NTA ला शनिवारी दुपारी १२ पर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रकाशित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
NEET Exam Paper Leak Case
NEET Exam Paper Leak Case Saam Digital
Published On

NEET पेपर लीकप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने NTA ला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. शनिवारी दुपारी १२ पर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रकाशित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. शहरे आणि केंद्रानुसार आकडेवारी जाहीर करावी पण हे करताना विद्यार्थ्यांची ओळख लपवावी. पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात 22 जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. पेपर फुटला होता यात शंका नाही, पण फेरपरीक्षा होईल की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

NEET Exam Paper Leak Case
Chandigarh Express Accident Video: गोरखपूरला जाणाऱ्या डिब्रूगढ़ चंदीगड एक्स्प्रेसचा मोठा अपघात; अनेक डबे रुळावरुन घसरले

देशात NEET पेपर लिक प्रकरणात लोखो विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे. आजच्या सुनावणीत कोर्टाने सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेता येणार नाही. संपूर्ण परीक्षेवर पेवरफुटीचा विपरीत परिणाम झाला आहे, याला ठोस आधार असल्याशिवाय फेरपरीक्षेचा आदेश देवू शकत नाही असं असं सरन्यायाधीश CJI DY चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील नरेंद्र हुडा यांना न्यायालयाने सांगितले की, पेपर लीक इतकी पद्धतशीर होती आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाला हे सिद्ध केलं पाहिजे, असंही न्यायालयाने म्हटलं होतं.

सुनावणी अखेर न्यायलयाने NTA ला शनिवारी दुपारी १२ पर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रकाशित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिले. शहरे आणि केंद्रानुसार आकडेवारी जाहीर करावी पण हे करताना विद्यार्थ्यांची ओळख लपवावी, असंही म्हटलं आहे. तसंच पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात 22 जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. पेपर फुटला होता यात शंका नाही, पण फेरपरीक्षा होईल की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.

NEET Exam Paper Leak Case
Jammu Kashmir Terrorist Attack: कुपवाडात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री; २ दहशतवाद्यांचा खात्मा

फेरपरीक्षा धेतली तर 23 लाखांपैकी केवळ 1 लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल. उर्वरीत २२ लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तीवाद खोडून काढताना, संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाल्याचा ठोस आधार घेऊनच फेरपरीक्षा घेण्यात यावी. पेपर लीक इतकी पद्धतशीर होती आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाला हे सिद्ध केलं पाहिजे, असंही न्यायालयाने म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com