yavatmal Crime News SaamTv
महाराष्ट्र

DCC Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अकरा कर्मचा-यांवर गुन्हा हाेणार; एसपींनी काढले फर्मान

या प्रकरणाचा पाेलिसांनी छडा लावा अशी अपेक्षा शेतक-यांची आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal News : मृतकाच्या नावाने परस्पर पैसे काढण्याच्या प्रकरणात यवतमाळच्या (yavatmal) महागाव पोलीस (police) ठाणे अंतर्गत येणाऱ्या हिवरा संगम येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकरा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी महागाव पोलिसांना दिले आहेत.

हिवरा संगम येथील जिल्हा मध्यवर्ती बँक (dcc bank) अंतर्गत येणाऱ्या चिखलगव्हाण आणि इतर सोसायट्यांमध्ये अनागोंदी कारभार यापूर्वीच उघडकीस आला होता. कर्जदारांना परस्पर अतिरिक्त कर्जवाटप करणे, कर्ज असताना निरंक असा दाखला देत पुन्हा कर्ज देणे, मृतकांच्या नावे पैसे काढणे, नियम डावलून कर्ज वितरित करणे असे प्रकार येत घडलेत.

त्यामुळे काही महिन्यापूर्वी बँकेतील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने तसेच संचालक मंडळाने संबंधितांना निलंबित केले. दरम्यान सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महागाव पोलीस स्टेशनला अकरा कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. (Breaking Marathi News)

त्यामुळे आगामी काळात मृतकाच्या नावाने परस्पर पैसे काढण्याच्या प्रकरणात हिवरा संगम येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकरा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल हाेण्याची शक्यता बळवावली आहे. या प्रकरणाचा पाेलिसांनी छडा लावा अशी अपेक्षा शेतक-यांची आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : ठाकरेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती, शिंदेंची शिवसेना एकाकी, रायगडचे राजकारण तापलं

Pune Crime: पुणे हादरलं! १८ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला, प्रेमाचा थरारक शेवट

Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनसाठी महाबळेश्वर, माथेरान कशाला? भारतातली ही खास अन् शांत ठिकाणं ठरतील बेस्ट

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची शरद पवार गटातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT