Ravikant Tupkar : न्यायालयीन काेठडीत रविकांत तुपकरांचा अन्न त्याग; ज्येष्ठांवरील लाठीचार्जमुळे आई भडकल्या, माजलेत सगळे...,

अकोला येथील कारागृहात रवीकांत तुपकर यांची रवानगी करण्यात आली आहे.
Ravikant Tupkar, Buldhana, Akola
Ravikant Tupkar, Buldhana, Akolasaam tv
Published On

Ravikant Tupkar Latest News : सोयाबीन (soyabean) आणि कापसाच्या (cotton) प्रश्नाबाबत केंद्र (central governement) आणि राज्य सरकारला (maharashtra government) जागे करण्यासाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkar sanghatana) संघटक रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी आत्मदहन करण्याचे प्रयत्न केला हाेता.

Ravikant Tupkar, Buldhana, Akola
Gajanan Maharaj Prakatdin : 'गण गण गणात बोते' जयघाेषाने शेगाव नगरी दुमदुमली; लाखाे भाविक दर्शन रांगेत

तुपकर यांनी पाेलिसांचा (police) वेषात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना बुलढाणा (buldhana) पाेलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. तुपकर यांची अकाेला येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान तुपकर यांनी जेलमध्ये अन्न त्याग आंदाेलन (ravikant tupkar fasting andolan) सुरु केले आहे. अन्न त्याग आंदाेलनाची माहिती तुपकर यांच्या पत्नी अड शर्वरी यांनी दिली.

अड शर्वरी तुपकर म्हणाल्या बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायाल्याने रविकांत तुपकर यांच्यासह 25 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. अकोला येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. शेतक-यांच्या हितासाठी लढणा-या रवीकांत यांचे कारगृहात सुद्धा अन्न त्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ravikant Tupkar, Buldhana, Akola
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

दरम्यान रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री गीताबाई तुपकर यांच्या भावना तीव्र हाेत्या. त्या म्हणाल्या माझ्या मुलाने कुठे डाका टाकला का? ताे काय गुंडा आहे का ? का त्याने बँक लुटली त्याच्यावर लाठीचार्ज करायला. त्याचा जन्मच संघर्षासाठी झाला आहे असे गीताबाईंनी अभिमानाने सांगितले.

गीताबाई म्हणाल्या माझ्या मुलाने खोके आणले का. पोलीस दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे आंदोलन चिरडलं गेले. आम्ही पीकवतो तेव्हा सर्व खातो अशी संतप्त प्रतिक्रिया गीताबाईंची हाेती. समाजसेवक आहे माझा मूलगा रवीकांत असेही त्यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com