hsc exam paper, parbhani, sonpeth police saam tv
महाराष्ट्र

HSC Exam : बारावीच्या परीक्षेत 'हायटेक' कॉपी ! 'या' जिल्ह्यातील सहा शिक्षकांना अटक

या प्रकरामुळे परभणी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

राजेश काटकर

Parbhani : इयत्ता बारावीचा (HSC) इंग्रजी विषयाचा पेपर (HSC English Subject Paper) विद्यार्थ्यांना (students) पूरविल्या प्रकरणी साेनपेठ पाेलिसांनी (sonpeth police) सहा शिक्षकांवर (teachers) गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाेलिसांनी सहाही शिक्षकांना अटक (arrests) केल्याची घटना परभणी (parbhani latest news) जिल्ह्यात घडली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेस मंगळवारी प्रारंभ झाला. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सोनपेठ तालुक्यातील शिक्षकांमुळे कॉपीमुक्त परीक्षेचा बट्ट्याबोळ झाला. इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होण्यापुर्वी सोनपेठ येथे विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पेपर व्हायरल झाला.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - सोनपेठच्या महालिंगेशवर माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयातील दोघा शिक्षकांनी इंग्रजी विषयाचा पेपर हाती पडताच त्याचे फोटो समाज माध्यमातून अन्य चौघा शिक्षकांना पाठवले. त्यानंतर संबंधित शिक्षकांनी त्याची कॉपी तयार करून विद्यार्थ्यांना पुरवली. (Maharashtra News)

यामुळे काॅपीचा सुळसुळाट पाहिला मिळाला. दरम्यान या प्रकरणी पाेलिसांनी शिक्षकांवर गुन्हा दाखल केला. संबंधित सहा शिक्षकांना सोनपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे परभणीच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT