HSC Exam : बारावीतील १३ कॉपी बहाद्दरांना खूद्द जिल्हाधिका-यांनी पकडलं; जालन्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ

Cheating In HSC Board Exam: केंद्रात मोठ्या प्रमाणात कॉपी पुरवल्या जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना मिळाली.
jalna , hsc exam
jalna , hsc examsaam tv
Published On

Jalna News : राज्यात मंगळवारपासू इयत्ता १२ वीच्या परीक्षेस (HSC Exam) प्रारंभ झाला. या परिक्षेत विद्यार्थ्यांनी (students) चुकीचे मार्ग अवलंबू नयेत यासाठी ठाेस उपाययाेजना करण्यात आल्या आहेत. तरी देखील जालना (jalna) जिल्ह्यात १३ कॉपी बहाद्दरांना खूद्द जिल्हाधिकारी यांनी रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra News)

jalna , hsc exam
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारी उतरणार रस्त्यावर; चक्काजाम आंदाेलनाचा निर्धार

जालना जिल्ह्यात ७८ केंद्रावर ३१ हजार १२७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मंगळवारी पहिला पेपर इंग्रजी विषयाचा हाेता. जिल्ह्यात १६ भरारी पथक तैनात करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड (dr. vijay ratohd) यांनी जालना तालुक्यातील सेवली केंद्रावरील लोकमान्य टिळक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रावर जाऊन सेंटरची पाहणी केली.

ही पाहणी करत असताना या दोन्ही केंद्रावर पहिल्याच दिवशीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपी करताना १३ कॉपी बहाद्दरांना (students) रंगेहाथ पकडण्यात आले. या दोन्ही सेंटरवर मोठ्या प्रमाणात कॉपी पुरवल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वतः तेथे जात कारवाई केली.

jalna , hsc exam
Sangli : काय सांगता ! 'या' ज्वारीला मिळताेय तीनशे रुपये प्रति किलो दर

जिल्हाधिकारी यांनी स्वत: कारवाई केल्याने परीक्षा केंद्र प्रमुखासह सहप्रमुखांची धाबे दणाणले आहे. जालन्यात काॅपीमुक्त अभियानासाठी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बैठे पथकांसह १६ भरारी पथके तैनात करण्यात आली असताना कॉपी केल्या जात असल्याचे प्रकार समोर आले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com