Solapur News  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: जेवणाचा डबा घरी विसरली म्हणून परत आली, दरवाजा लावून संपवलं आयुष्य, १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येने हळहळ

Solapur Student End Life: सोलापुरमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. जेवणाचा डबा आणण्यासाठी ती घरी आली त्यानंतर तिने दरवाजा लावून गळफास घेतला. पोलिस सध्या तपास करत आहेत.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूरमध्ये ही घटना घडली. १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेत आयुष्य संपवलं. राहत्या घरातच तिने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पण या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली.

श्रेया पुंडलिक गायकवाड (वय १८ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. लहान असतानाच श्रेयाच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. मात्र ती आणि तिची बहीण आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने शिक्षण घेत होत्या. सकाळी कॉलेजला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे दोघी निघाल्या होत्या. मात्र डबा विसरल्याने त्या घरी परत आल्या. मात्र डबा न घेता श्रेयाने घराचा दरवाजा बंद करून ओढणीने गळफास घेतला. एकमेकीला कधीच सोडून न राहणाऱ्या या सख्ख्या बहिणीतील बीएससीचे शिक्षण घेणारी श्रेया ही आपल्या लाडक्या स्नेहल या बहिणीला एकटी सोडून गेली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर या गावी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. श्रेया कायमची सोडून गेल्यामुळे तिच्या बहिणीला मोठा धक्का बसला.

या घटनेची माहीती मिळताच मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या केलेली श्रेया आणि तिची मोठी बहीण स्नेहल या दोघी सकाळी कॉलेजसाठी सोलापूरला जाण्यासाठी घरातून निघाल्या. मात्र जेवणाचा डबा विसरल्याने त्या दोघी पुन्हा घरी परत आल्या. मोठी बहीण स्नेहल ही बाहेर बाथरूमला गेली. तेव्हा श्रेयाने घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला.

राहत्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेत तिने आत्महत्या केली. मोठी बहीण स्नेहल ही थोड्या वेळात घरी आली तर दरवाजा आतून बंद होता. आवाज दिला तर श्रेयाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने खिडकीतून डोकावून पाहिले तर श्रेया पंख्याला लटकत असल्याचे तिला दिसले. घराशेजारील चुलत भावांना तिने ओरडून माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडला. लगेच श्रेयाला एका खासगी वाहनातून बेशुद्धावस्थेत मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी तिला मृत घोषीत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT