Solapur Crime News
shocking crime in Solapur’s Mangrul village where a man and his lover plotted a fake suicide by burning a mentally ill womanSaam TV News Marathi

Solapur : वहिनीसोबत प्रेम, दुसरीचाच केला गेम; घराच्यांना गंडवण्यासाठी कट रचला, पण जाळ्यात फसला

Affair with sister-in-law leads to murder in Solapur : सोलापूरच्या मंगळवेढ्यात चुलत दीर व वहिनीने घरातून पळून जाण्यासाठी बनावट आत्महत्येचा कट रचला आणि एका मनोरुग्ण महिलेला जिवंत जाळलं. पोलिस तपासात खळबळजनक बिंग फुटलं.
Published on

Solapur man fakes lover’s death and burns another woman : प्रेमात माणूस कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. सोलापूरमधील घटनेने पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे. सोलापूरमधील मंगळवेढामधील निशांत सावंत याचा वहिनी किरण सावंतवर जीव जडला. दोघांच्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध होता, त्यामुळे पळून जायचा प्लॅन दोघांनी आखला. त्यासाटी निशांत याने एखाद्या चित्रपटाला लाजवेल असं प्लॅनिंग केले. निशांत याने एका मनोरूग्ण महिलेला पळवून गावात आणलं अन् तिला पेटवलं. त्यानंतर किरण हिने पेटवून घेतल्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या हुशारीमुळे त्याचे बिंग फुटले अन् जाळ्यात अडकला. मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ गावामध्ये ही फिल्टी घटना घडली आहे. याप्रकरणी किरण सावंत व प्रियकर चुलत दीर निशांत सावंत यांना पोलिसांनी अटक केली आहे.

विवाहित किरण सावंत व तिचा चुलत दीर निशांत सावंत यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेम संबंधाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही घर सोडून अन्य ठिकाणी राहायला जाणार होते. त्यासाठी प्रियकर निशांत सावंत याने प्रियसी किरण सावंत हिच्या आत्महत्येचा बनाव रचला. यासाठी त्याने एका मनोरूग्ण महिलेला पळून आणून गावात ठेवले. १४ जुलै रोजी पहाटे सुमारास किरण सावंत हिच्या आत्महत्या बनाव करण्यासाठी कडब्याच्या गंजीत महिलेला पेटवून दिले. त्यानंतर प्रियकर निशांत यानेच किरण हिने पेटवून घेतल्याचे कांगावा करत आरडाओरड केली.

Solapur Crime News
आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

सासरच्या लोकांनी किरण सावंत तिने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर तिचे नातेवाईक त्यांच्या गावी आले. यावेळी प्रियकर निशांत सावंतही तिथेच उपस्थित होता. यावेळी पोलिसांना संशय आल्याने वेगळ्या दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी किरणच्या मोबाईलचा सीडीआर तपासला असता ती कराडच्या जवळ असल्याचे समोर आले. पोलिसांना शंका आल्याने प्रियकर निशांत सावंत याला किरणच्या मोबाईलवर व्हीडिओ कॉल करायला लावला, तो कॉल किरण हिने उचलला केला. इथेच दोघांचा भंडाफोड झाला. त्यानंतर किरण सावंत ही विवाहित महिला जिवंत असल्याचे समोर आले, त्यानंतर पोलिसांनी कराड येथून संशयित आरोपी किरण सावंत हिला ताब्यात घेतले.

Solapur Crime News
Budhwar Peth : बुधावर पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्यांचा पाठलाग करायचं अन् लुटायचे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पोलीस तपासामध्ये आरोपी निशांत सावंत यांनीच प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव करण्यासाठी एका मनोरुग्ण महिलेला कडब्याच्या गंजीत ठेवून जाळल्याची कबुली दिली आहे. आता जाळण्यात आलेली मनोरूग्ण महिला कोण आहे? याचा पोलिस शोध घेत आहेत. किरण आणि निशांत यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. सोलापूरमधील मंगळवेढ्यातील घटना एखाद्या चित्रपटाला लाजवणारही आहे.

Solapur Crime News
बायोलॉजी-फिजिक्सच्या प्राध्यापकांनी विद्यार्थिनीचा केला बलात्कार, ब्लॅकमेल करत लुटली अब्रू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com