Solapur  Saam
महाराष्ट्र

Solapur : सोलापूर हादरले! पत्नीने सासरी येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने ३ मुलांना शेतात नेऊन पाजले विष

Solapur news today : सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे गावात वडिलांनी तीन मुलांना विष पाजून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी

Solapur father poisons children suicide case : सोलापूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. बापानेच ३ चिमुकल्या मुलांना विष पाजले आणि स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरगुती वादातूनच पित्याने आपल्या तीन चिमुकल्यांना विष पाजून स्वतःही जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात घडलेल्या या घटनेमुळे सोलापूरवर शोककळा पसरली आहे. भीमा अण्णा वाघमारे असे आत्महत्या केलेल्या बापाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय भीमा अण्णा वाघमारे हे एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. भीमा आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काही कारणांमुळे सतत वाद होत होते. याच वादातून पत्नी रागावून माहेरी निघून गेली होती. भीमा आणि त्यांच्या नातेवाईकांनी पत्नीची समजूत काढून तिला घरी परत आणण्याचे अनेक प्रयत्न केले. पण भीमा यांच्या पत्नीने सासरी परतण्यास नकार दिला.

पत्नी परत येत नसल्याच्या नैराश्यातून आणि संतापातून भीमा वाघमारे यांनी टोकाचे पाऊल उचलले. भीमा यांनी आपली तीन मुले जानवी, प्रगती आणि बाबू यांना वळसंग जवळील एका शेतात नेले. तिथे त्यांनी आधी तिन्ही निष्पाप मुलांना विष पाजले. त्यानंतर भीमाने स्वतःही विष प्राशन केले. या दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाला, तर मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच भीमा वाघमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदैवाने तिन्ही मुलांना वेळेत शोधून तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे. सध्या या तिन्ही चिमुकल्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

तिऱ्हे गावातील या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी भीमा वाघमारे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला. घरगुती वादातून इतक्या टोकाचा निर्णय घेतल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाची टीप :

आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी टोकाचे पाऊल उचलणे हा काही पर्याय नाही. कौटुंबिक समस्यांवर संवाद आणि समुपदेशनातून मार्ग काढता येतो. संकटाच्या वेळी मानसिक आधार घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT