सोलापूर : सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे-तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. (Sanjay Raut Live : Shivsena Banner In Solapur)
हे देखील पहा :
राऊत देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लक्ष्य करणार की किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) तोफ डागणार, गिरीश महाजन-आशिष शेलार-चंद्रकांत पाटील यापैकी कोण नेते राऊतांच्या रडारवर असतील, याबाबात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मुंबईच्या शिवसेना (Shivsena) भवनात ही पत्रकार परिषद होत आहे. संबंध महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.
मुंबईमध्ये हा सगळा राजकीय कार्यक्रम रंगला असतानाच सोलापूरात देखील शिवसैनिकांनी आक्रमक होत पोस्टारबाजी केली आहे. शिवसेनेच्या आणि भाजपच्या वादास पूर्णविराम मिळणार नसल्याचेच चित्र येत्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळणार असल्याचे सध्या दिसत आहे. खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ सोलापुरातील (Solapur) शिवसैनिक सरसावला असून त्यांनी शहरातल्या मध्यवर्ती असणाऱ्या नवी पेठ परिसरात संजय राऊत यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स लावत पोस्टरबाजी केलीय.
मोदी-शहांच्या भाजप सरकारकडून सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा राजकीय दबाव तंत्रासाठी वापर होत आहे. केवळ भाजपेतर (BJP) राजकीय पक्षांच्या नेत्यांना केंद्र सरकार लक्ष्य करत आहे. याच संदर्भात गौप्यस्फोट करण्यासाठी खासदार संजय राऊत हे आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आहेत. त्यानिमित्ताने शिवसेना भवनात जय्यत तयारी देखील करण्यात आलीय.
तर महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात शिवसैनिकांकडून संजय राऊत यांच्या भूमिकेचे पोस्टर लावले जाता आहेत. भाजप नेते हे किरीट सोमय्या हे उभारलेल्या संजय राऊत यांच्या पायाखाली आल्याचे सोलापुरात शिवसैनिकांनी लावलेल्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलंय. 'बरदास्त किया अब बरबाद करेंगे' "105 असंतुष्ट आतमे अन् एकच संजय राऊतच" अशा पद्धतीचा मजकूर या फ्लेक्स वरती लिहिण्यात आलाय.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.