- तबरेज शेख
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा नगरपंचायतीच्या (Surgana Nagarpanchayat) नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. नगराध्यक्षपदाच्या (Mayor) निवडणुकीपूर्वी सहलीत गेलेल्या भाजप नगरसेविकेचा (Corporator) मृत्यू झाला आहे. मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये नगरसेविकेला आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. (Surgana BJP corporator dies of heart attack Before mayoral election)
हे देखील पाहा :
सुरगाणा (Surgana) नगरपंचायतीत वार्ड क्रमांक १६ मधून नगरसेविका काशीबाई पवार निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष पदाची निवडणुक (Election) 15 तारखेला आहे. त्या अगोदर दगाफटका नको म्हणून भाजपने (BJP) नगरसेवकांची सहल काढली होती. निवडणुकीच्या ऐनवेळी अगोदर येऊन बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.