Tejaswi Satpute Saam tv
महाराष्ट्र

शिरवळच्या दराेड्यासह ५ घरफाेडीतील आराेपींचा शाेध सुरु : तेजस्वी सातपुते

या गुन्ह्यांमधील अन्य पाच आरोपींचा शोध सुरू आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : अक्कलकोट (akkalkot) तालुक्यातील शिरवळ येथील दरोड्यासह (burglary) हन्नुर ,चपळगाव , पानमंगरुळ , तडवळ तसेच मोहोळ (mohol) तालुक्यातील सौंदणे येथील घरफोडी अशा गुन्ह्यांची उकल करून १८ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (local crime branch) सोलापुर ग्रामीणच्या (solapur rural police) पथकाला यश आले आहे. (solapur latest marathi news)

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून शांताबाई दत्तात्रय परुळेकर यांच्यासह त्यांचे पतींना मारहाण करून ३ लाख १६ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असता गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून सनीदेवल सुरेश काळे (वय २५ राहणार - पानमंगरुळ ता.अक्कलकोट हल्ली रा.सुकी पिंपरी ता.पूर्णा जि. परभणी) या संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (tejaswi satpute) म्हणाल्या अक्कलकोट तालुक्यातील सहा गुन्हे आणि मोहोळ तालुक्यातील एक असे सात गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. यामध्ये ३९ तोळे सोन्याच्या दागिन्यासह ८० ग्राम चांदीचे दागिने असा १८ लाख ७६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमधील अन्य पाच आरोपींचा शोध सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

SCROLL FOR NEXT