Solapur Pune Highway Accident  Saam TV News
महाराष्ट्र

Accident : सोलापूर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल पलटली, पुण्यातील ३० जण जखमी, २० जणांची प्रकृती गंभीर

Solapur-Pune Highway Tragedy: सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ खासगी ट्रॅव्हल पलटल्याने भीषण अपघातात ३० प्रवासी जखमी झाले, यातील २० जणांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ मदत कार्य हाती घेतलं असून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Solapur Pune Highway Accident : सोलापूर-पुणे महामार्गावर आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. खासगी ट्रॅव्हल पलटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये ३० प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील २० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोलापूर पुणे महामार्गावर टेंभुर्णी जवळ आढेगाव शिवारात आज पहाटे प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल पलटल्यामुळे दुर्घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास चालकाला झोप लागल्यांमुळे ट्रॅव्हल खड्ड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल्समध्ये पुणे आणि मराठवाड्यातील प्रवासी होते. शिरपूर लातूर येथून पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल पहाटे पलटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या अपघातामध्ये ३० जण जखमी झाले आहेत.

आढेगावजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांनाही या घटनेबाबात तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींनी तातडीने रूग्णालयात उपचारासाठी पाठवले. अपघातानंतर सोलापूर-पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. टेंभुर्णी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Mumbai Goa Highway Accident मुंबई-गोवा महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात

लोणेरे नजीक टेमपाले गाव हद्दीतील उड्डाण पुलावर मुंबई-गोवा महामार्गावर कारवर ट्रक कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू असून वाहतूक सुरळीत चालू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT