सचिन बनसोडे, अहिल्यानगर प्रतिनिधी
Major Accident in Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये साई भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये प्रवास करणारे १२ जण थोडक्यात बचावले. अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवरा नदीच्या पुलावर क्रूझर आणि नेक्सन कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर काही काळ नगर-मनमाड महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती मात्र स्थानिकांनी दोन्ही वाहने बाजूला घेऊन महामार्ग खुला करून दिला..
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर मनमाड महामार्गावर दोन वाहनांचा भीषण अपघात होऊन १२ साईभक्त जखमी झाले आहेत. कोल्हार येथील प्रवरा नदीच्या पुलावर आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आले आहे.
राहाता तालुक्यातील कोल्हार येथील प्रवरा नदीच्या पुलावर क्रूझर आणि नेक्सन कारची सकाळी समोरासमोर धडक झाली.. या अपघातात क्रूझर गाडी रस्त्यावरच पलटी होऊन त्यातील १२ प्रवासी जखमी झाले. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले तसेच पलटी झालेले क्रूझर वाहन सरळ केले. जखमींना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. क्रूझर गाडीतील प्रवासी हे कर्नाटक राज्यातील असून ते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीच्या दिशेने चालले होते. त्याचप्रमाणे अपघातातील कार ही मध्यप्रदेश राज्यातील असून शिर्डीहून नगरच्या दिशेने चालली होती. या अपघातात कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यातील प्रवासी किरकोळ जखमी झालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.