Congress Saam tv
महाराष्ट्र

Solapur Politics: सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेच पक्षाला ठोकला रामराम

Solapur Municipal Corporations Election: सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी दिलेल्या उमेदवारानेच पक्ष सोडलाय. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

  • सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का

  • उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेच पक्ष सोडला

  • संबंधित उमेदवाराचा थेट एमआयएममध्ये प्रवेश

मुंबई, पुणे आणि नाशिकप्रमाणे सोलापूर महापालिकेत ट्विस्टवर ट्विस्ट येत आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्याच उमेदवारानेच पक्षाला रामराम ठोकला आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. काँग्रेस पक्षाने यात आघाडी घेत सोलापूरमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

यात एक माजी महापौर, शहराध्यक्ष यांच्यासह नऊ माजी नगरसेवकांचा समावेश होता,मात्र यातील एका उमेदवाराने पक्षाला रामराम ठोकत थेट एमआयएममध्ये केला आहे. सोलापुरातील प्रभाग 16 मधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.

फिरदोस पटेल या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना अपमानस्पद वागणूक दिल्याचा द आरोप करत फिरदोस पटेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. फिरदोस पटेल या एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या नातेवाईक आहेत. शौकत पठाण यांच्या मध्यस्थीने फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे.

फिरदोस पटेल या पक्षप्रवेशाविषयी बोलताना म्हणाल्या काँग्रेसनं उमेदवारी दिली होती, पण आपल्या निष्ठेवरती प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे काँग्रेसपेक्षा एमआयएम पक्ष चांगला ठरेल. काँग्रेसने उमेदवारी दिली होती, तरीही दुसऱ्या पक्षात का जात आहात, असा प्रश्न फिरदोस पटेल यांना विचारण्यात आला, त्यावेळी त्या म्हणाल्या एमआयएमने देखील उमेदवारीचं आश्वसन दिलंय. आपण कोणावर नाराज नाही, काँग्रेसला सोडण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्याच फायद्यासाठी घेतल्याचंही फिरदोस पटेल म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार; ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

Bracelet Mangalsutra Design: सध्या ट्रेंडींग असलेले ब्रेसलेट मंगळसूत्र करा तुम्ही पण ट्राय; 'या' आहेत लेटेस्ट ५ डिझाइन

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्येही महायुती तुटली; अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला 24 तासांचा अल्टीमेटम, ऐन निवडणुकीत महायुतीमध्ये वादंग|VIDEO

SCROLL FOR NEXT