Solapur Municipal Election: महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी; माजी महापौरासह या नेत्यांना दिली उमेदवारी, वाचा संपूर्ण यादी

Solapur Municipal Election Congress Candidates List : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी, काँग्रेसने २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ म्हणून समोर आला आहे.
Solapur Municipal Election: महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी; माजी महापौरासह या नेत्यांना दिली उमेदवारी, वाचा संपूर्ण यादी
Published On
Summary
  • सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

  • पहिल्या टप्प्यात २० उमेदवारांना तिकीट

  • १०२ जागांपैकी ४५ जागांसह काँग्रेस ठरली मोठा भाऊ

भाजप आणि शिवसेना युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असतानाच सोलापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसनं महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत २० उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. तर माजी महापौर, शहराध्यक्ष, माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आलीय. याआधी काँग्रेसने कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ४८ उमेदवार जाहीर केलेत.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, माकप ह्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत महापालिकेच्या जागावाटपाबाबत घोषणा केली. त्यामळे सोलापुरात भाजप-शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगेल. सोलापुरातील महापालिकेच्या १०२ जागांसाठी हे जागावाटप निश्चित झाले आहे. यानुसार ४५ जागांसह काँग्रेस मोठा भाऊ ठरलाय.

Solapur Municipal Election: महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी; माजी महापौरासह या नेत्यांना दिली उमेदवारी, वाचा संपूर्ण यादी
Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांसाठी निवडणूक होतेय. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालीय. सोलापूरमध्ये भाजपाकडून आधी उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. काँग्रेसने १० प्रभागांमधून २० उमेदवार जाहीर केले आहेत. शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची सून सीमा यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा परवीन शेख, माजी महापौर संजय हेमगड्डी यांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे.

Solapur Municipal Election: महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी; माजी महापौरासह या नेत्यांना दिली उमेदवारी, वाचा संपूर्ण यादी
Ajit Pawar News : अजित पवार गटात नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार?

जाणून घ्या प्रभागानुसार उमेदवारांची नावे

९ अ) - दत्तु नागप्पा बंदपट्टे

११ ड) - धोंडप्पा गोविंदप्पा तोरणगी

१४ ब) - शोएब अनिसुर रहेमान महागामी

१५ ब) - सबा परवीन आरिफ शेख

१४ ड) - बागवान खलिफा नसीम अहमद बशीर अहमद

१५ क) - चेतन पंडित नरोटे

१५ ड) - मनिष नितीन व्यवहारे

१६ ब) - फिरदौस मौलाली पटेल

१७ अ) - सौ. शुभांगी विश्वजीत लिंगराज

१६ क) - सौ. सीमा मनोज यलगुलवार

१७ ब) - परशुराम छोटूसिंग सतारेवाले

१६ ड) - नरसिंग नरसप्पा कोळी

१७ ड) - वहिद अब्दुल गफूर बिजापूरे

२० अ) - सौ. अनुराधा सुधाकर काटकर

२१ अ) - प्रतीक्षा प्रवीण निकाळजे

२२ अ) - संजय चन्नवीरप्पा हेगड्डी

२१ क) - सौ. किरण शितलकुमार टेकाळे

२२ क) - सौ. राजनंदा गणेश डोंगरे

२१ ड) - रियाज इब्राहिम हुंडेकरी

२३ ब) - सौ. दिपाली सागर शहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com