BJP leaders during a party meeting in Solapur amid internal disciplinary action against corporators. 
महाराष्ट्र

Solapur Politics: सभागृह नेत्याचा दणका;भाजपच्या ७५ नगरसेवकांना बजावली नोटीस, काय आहे कारण?

Solapur Municipal Corporation: पक्षाच्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्याबद्दल ७५ नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. यासंदर्भात सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवण्यात येणार आहे. काय कार्यक्रम होता, कधी होता याची माहिती जाणून घेऊ.

Bharat Jadhav
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यामुळे ७५ नगरसेवकांना नोटीस.

  • सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी कठोर भूमिका घेतली.

  • सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवला जाणार.

सोलापूर महापालिकेत ८७ जागा जिंकून भाजप सत्तेवर आलं. नगरसेवकांच्या मानेवर कारवाईची तलवार टांगती तलवार आहे. पक्ष शिस्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी ७५ नगरसेविकांना नोटीस बजावली आहे. याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी ‘सेवा व समर्पण सप्ताह’ म्हणून साजरी करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार सोलापूर महापालिकेतील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित 11 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

त्यामुळे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास सर्व नगरसेवकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे,असे निर्देश दिले. पण देऊनही भाजपचे अनेक नगरसेवकांनी कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे पक्षशिस्तीचा प्रश्न निर्माण झाला असून नरेंद्र काळे यांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गैरहजर राहिलेल्या तब्बल ७५ नगरसेवकांना काळे यांनी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासह अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

नगरसेवकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य व विचार हे भाजपसाठी कायमच मार्गदर्शक आहेत.त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष वेळ देतात. पण नगरसेवक गैरहजर राहिल्याने त्यांच्या वर्तनावर भाजप सभागृह नेते नरेंद्र काळे संतापले आहेत. सूचना देऊनही कार्यक्रमाला गैरहजर राहणे, हे अत्यंत गंभीर मानले जाईल, असा इशाराच काळे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT