Congress: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ; काँग्रेसच्या बड्या नेत्याविरुद्ध अटक वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

Congress Leader Ranjeet Deshmukh: काँग्रेसच्या बड्या नेत्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले.
Congress: काँग्रेसच्या बड्या नेत्याविरोधात अटक वॉरंट जारी,  राजकीय वर्तुळात खळबळ; नेमकं प्रकरण काय?
CongressSaam tv
Published On

Summary:

  • काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

  • धनादेश न वटवल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली

  • ११.५० लाख रुपयांच्या ५ धनादेशांपैकी एकही धनादेश वठला नाही

  • न्यायालयात वारंवार अनुपस्थित राहिल्याने थेट अटक वॉरंट जारी करण्यात आले

पराग ढोबळे, नागपूर

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रणजित देशमुख यांच्याविरोधात अटक वॅारंट जारी करण्यात आले आहे. धनादेश न वटल्याने न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॅारंट जारी केला आहे. त्यामुळे देशमुखांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने रणजीत देशमुख यांच्यासह तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॅारंट जारी करण्यात आले आहे. याचिकाकर्ते अतुल देवगडे यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. ११ लाख रुपयांचे ५ धनादेश देवगडे यांना देण्यात आले होते, त्यापैकी एकही धनादेश वठला नाही.

Congress: काँग्रेसच्या बड्या नेत्याविरोधात अटक वॉरंट जारी,  राजकीय वर्तुळात खळबळ; नेमकं प्रकरण काय?
Nagpur crime : प्रियकराने प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावलं; अचानक दोघांमध्ये बिनसलं, धारदार शस्त्राने गळाच चिरला

धनादेश अनादर प्रकरणात अतुल प्रभाकर देवगडे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, परसेप्ट वेब सोल्यूशन प्रा. लिमिटेडच्या संचालकांनी संगणक, इंटरनेट आणि वेबसंदर्भातील साहित्य खरेदी केले होते. रणजित देशमुख, पल्लवी पारेख आणि अमित धुपे हे या कंपनीचे संचालक आहेत. कंपनीने ११,५०,००० रुपयंचे ५ धनादेश दिले. यातील एकही धनादेश वठला नाही.

Congress: काँग्रेसच्या बड्या नेत्याविरोधात अटक वॉरंट जारी,  राजकीय वर्तुळात खळबळ; नेमकं प्रकरण काय?
Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात

वारंवार पाठपुरावा करून आणि कायदेशीर नोटीस पाठवूनही उत्तर मिळत नाही त्यामुळे अतुल देवगडेंनी न्यायालयात धाव घेतली. तिघांनी देखील जामीन घेतला. पण या प्रकरणी खटला सुरू करण्यापूर्वी तिघांनी न्यायालयात हजर राहणे गरजेचे होते. ते या प्रकरणी न्यायालयात हजेरी लावत नसल्यामुळे न्यायालयाने तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी केले. त्यामुळे रणजित देशमुख यांच्या अडचणी वाढल्यात.

Congress: काँग्रेसच्या बड्या नेत्याविरोधात अटक वॉरंट जारी,  राजकीय वर्तुळात खळबळ; नेमकं प्रकरण काय?
Mumbai Nagpur Corridor : समृद्धी महामार्ग कोस्टल रोडशी जोडणार; मुंबई-नागपूर फक्त ८ तासात, वाचा सरकारचा नेमका प्लान काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com