Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात
Congress MLA ArrestedSaam Tv

Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात

Congress MLA Arrested: बलात्कार प्रकरणी काँग्रेसच्या आमदाराला अटक करण्यात आली. ३ महिलांनी या आमदारावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात नाव समोर येताच काँग्रेस पक्षाकडून आमदाराची हकालपट्टी करण्यात आली.
Published on

Summary -

  • काँग्रेस आमदार राहुल ममकूटथिल यांना अटक

  • लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्काराचा आरोप

  • गर्भवती झाल्यानंतर धमकी देऊन गर्भपात केल्याचा दावा

  • गंभीर आरोपांनंतर काँग्रेस पक्षातून आमदाराची हकालपट्टी

केरळच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेले आणि पलक्कडचे आमदार राहुल ममकूटथिल यांना रविवारी केरळ पोलिसांनी अटक केली. बलात्कार प्रकरणात त्यांच्याविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पलक्कड येथील एका हॉटेलमधून मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास त्यांना अटक केली. त्यानंतर चौकशीसाठी त्यांना पथनमथिट्टा जिल्हा पोलिस कॅम्पमध्ये नेण्यात आले.

राहुल ममकूटथिल यांच्याविरोधात पथनमथिट्टामधील एका महिलेने बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ही महिला सध्या कॅनडामध्ये राहते. या तक्रारीनंतर आमदाराविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली. या आमदाराविरोधात आतपर्यंत ३ महिलांनी बलात्काराचा आरोप केला आहे.

महिलेने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याप्रकरणाची माहिती दिली. तिने आरोप केला की, राहुल ममकूटथिल यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा महिला गर्भवती राहिली तेव्हा आमदाराने जबाबदारी घेण्यास नकार दिला आणि तिला गर्भपात करण्यासाठी धमकी दिली. आमदारावर अनेक वेळा महिलेकडून पैसे मागितल्याचाही आरोप आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत केला जात आहे.

Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात
Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना एका महिलेने पत्र पाठवत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राहुल ममकूटथिल यांच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात पोलिसांकडे एक ऑडिओ क्लिप देखील आहे. ज्यामध्ये राहुल ममकूटथिल गर्भपात करण्यासाठी महिलवर दबाव आणत असल्याचे ऐकू येते होते. राहुल ममकूटथिल यांच्याविरोधात दुसरा गुन्हा एका २३ वर्षीय महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर दाखल करण्यात आला होता. आता तिसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात
Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...

आमदारावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांचे गांभीर्य आणि वाढता कायदेशीर दबाव लक्षात घेता काँग्रेस पक्षाने राहुल ममकूटथिल यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाने त्यांचे प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकले आहे. प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांनी ही घोषणा केली. अभिनेत्री रुईनी एन. जॉर्ज यांनी गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर राहुल ममकूटथिल यांनी आधीच युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या अटकेची बातमी कळताच पलक्कडमधील सीपीआय(एम) युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात
Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com