Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...

Sambhajinagar Crime News : संभाजीनगरमध्ये कौटुंबिक नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मामीने अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...
Sambhajinagar Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • संभाजीनगरमध्ये अल्पवयीनावर अत्याचाराची गंभीर घटना

  • मामीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, अटक करण्यात आली

  • मामाच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल

  • प्रकरणाचा तपास सुरू; शहरात खळबळ

संभाजीनगरमध्ये एका कौटुंबिक नात्याला काळिमा फासणारा प्रसंग समोर आला आहे. मामीनेच भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समय (नाव बदलेल) हा अल्पवयीन मुलगा आईच्या निधनानंतर त्याच्या मामा मामीकडे राहू लागला. यादरम्यान समयचा त्याची मामी मामाच्या नकळत छळ करायची. शिवाय तिचं ऐकलं नाही तर ती पीडित मुलाला घराबाहेर हाकलवून लावण्याची धमकी द्यायची.

Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...
Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

मुलाने पोलिस तक्रारीत म्हटल्याप्रमाणे २०२३ मध्ये समयचा मामा कामावर गेल्यावर त्याच्या मामीने त्याला बेडरूममध्ये बोलावून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले आणि कोणाला काही सांगितल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. हा प्रकार गेले कित्येक महिने वारंवार सुरु होता.

Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...
Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

मामा घरातून बाहेर गेल्यावर मामी समयला छळत होती. समयच्या मामीने त्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून त्याला मुद्दाम मिठी मारायची अन् प्रकरण पुढं गेल्यावर मामीने थेट त्याच्याजवळ शरीरसुखाची मागणी केली. त्याला धमकी दिली अन् शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. बेडरूममध्ये बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पण एक दिवस मामाला हा सर्व प्रकार समजला.मात्र यानंतर समयने आणि त्याच्या मामाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील कारवाई सुरु आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com